Team India loses toss saam tv
Sports

Ind vs Sa: टीम इंडियाने पुन्हा गमावला टॉस, यशस्वी-ऋतुराजला संधी! पाहा दोन्ही संघांची प्लेईंग ११

Team India loses toss: भारतीय क्रिकेट संघाने पुन्हा एकदा टॉस गमावला आहे. दरम्यान ओपनिंग फलंदाजीची जबाबदारी कोण घेणार याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ३ सामन्यांच्या वनडे सिरीजमधील पहिला सामना रांचीमधील जेएससीए क्रिकेट स्टेडियमवर खेळला जातोय. टेस्ट सामने ०-२ ने गमावल्यानंतर, टीम इंडिया जोरदार कमबॅक करण्याचा विचार करतोय. दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे टीम इंडिया पहिल्यांदा फलंदाजीला उतरणार आहे.

दक्षिण आफ्रिकेकडून त्यांचा नियमित कर्णधार टेम्बा बावुमा आणि फिरकी गोलंदाज केशव महाराज यांना विश्रांती देण्यात आली आहे. बावुमाच्या अनुपस्थितीत, एडेन मार्कराम टीमचं नेतृत्व करतोय.

टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल दुखापतग्रस्त झाल्यानंतर केएल राहुल भारतीय टीमचं नेतृत्व करतोय. दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर वनडे सामन्यात खेळणाऱ्या ऋतुराज गायकवाडचे कमबॅक झालंय. रोहित शर्मासोबत यशस्वी जयस्वाल डावाची सुरुवात करणार आहे.

टॉसनंतर राहुलने सांगितलं की, हर्षित राणा, अर्शदीप सिंग आणि प्रसिद्ध कृष्णा हे वेगवान गोलंदाज असणार आहे. कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर हे दोन ऑलराऊंडर खेळाडू फिरकी विभाग सांभाळणार आहे. या सामन्यात ऋषभ पंतला संधी मिळाली नाही.

भारतीय संघाचा प्लेइंग-११

रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, वॉशिंग्टन सुंदर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसीध कृष्णा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dombivali: डोंबिवलीतील फडके रोडवरील धक्कादायक घटना; टेरेसची भिंत कोसळली

मुंबईत वंचित-काँग्रेस साथ साथ? आघाडीच्या चर्चेसाठी संयुक्त समिती?

Maharashtra Live News Update: निलंगा नगरपालिकेत पराभव झालेल्या उमेदवारांने काढली, आभार रॅली, कार्यकर्त्यांना अश्रू अनावर

Crime News: माजी पोलीस महानिरीक्षकानं स्वत:वर झाडली गोळी, १२ पानाच्या सुसाईड नोटमधून समोर आलं धक्कादायक कारण

20 हजारांची कॅश ठेवाल तर शिक्षा? कॅश सापडल्यास 100% दंड भरावा लागेल?

SCROLL FOR NEXT