Team India Test squad/social media file photo saam tv
Sports

IPL सुरू असतानाच टीम इंडियासाठी आली बॅड न्यूज; इंग्लंड, अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकांना २ खेळाडू मुकणार

team india bad news during ipl : सध्या आयपीएल सुरू असून, बहुतांश खेळाडू हे आयपीएल खेळत आहेत. तर काही खेळाडू अनफिट असल्यानं बाहेर आहेत. आता टीम इंडियासाठी वाईट बातमी आली आहे. टीम इंडियाचे दोन गोलंदाज अद्याप फिट नाहीत. त्यामुळं आगामी दोन मालिकांतून ते बाहेर राहण्याची शक्यता आहे.

Nandkumar Joshi

आयपीएल सुरू असतानाच भारतीय क्रिकेट संघाचं टेन्शन वाढवणारं वृत्त धडकलं आहे. भारतीय संघाला पुढील मालिका जूनच्या सुरुवातीला खेळायची आहे. मायदेशात अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी आणि वनडे मालिका होणार आहे. पण या मालिकांपूर्वीच खेळाडूंच्या फिटनेसची चिंता सतावत आहे. भारताचे गोलंदाज हर्षित राणा आणि आकाश दीप या दुखापतीतून अद्याप पूर्णपणे सावरलेले नाहीत. त्यामुळं या दोन मालिकांना ते मुकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अफगाणिस्तानच्या विरोधात मालिका झाल्यानंतर भारतीय संघ इंग्लंड आणि आयर्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. तेथे मर्यादित षटकांच्या मालिका खेळायच्या आहेत. या मालिकांआधी हे दोन्ही गोलंदाज फिट होतील का, असा प्रश्न आहे. त्यामुळं सध्याची स्थिती बघता हे दोन्ही खेळाडू कमबॅक करतील का, याबाबत साशंकता आहे.

रिहॅब प्रोसेसमध्ये आकाश दीप आणि हर्षित राणा

आकाश दीप आणि हर्षित राणा हे दोन्हीही वेगवान गोलंदाज बऱ्याच काळापासून दुखापतीमुळं संघाच्या बाहेर आहेत. आकाश दीप बॅक इंजरीमुळं त्रासलेला आहे. तर हर्षित राणा देखील पायाच्या दुखण्यामुळं टी २० वर्ल्डकपआधीपासूनच संघाच्या बाहेर आहे. ते संघात कधी पुनरागमन करतील याबाबत पीटीआयला बीसीसीआयच्या सूत्रांनी नाव न छापण्याच्या अटीवर प्रतिक्रिया दिली आहे.

आकाश दीप आणि हर्षित राणा हे दोन्ही वेगवान गोलंदाज सध्या रिहॅब प्रोसेसमध्ये आहेत. दोन्हीही गोलंदाजांना फिट होण्यासाठी अजून बराच काळ लागण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तानविरुद्धची कसोटी मालिका आणि इंग्लंड-आयर्लंड दौऱ्याआधी हे दोघे फिट होण्याची शक्यता धुसर आहे. सध्या त्यांनी एक्सरसाइज सुरू केली आहे. त्यानंतर जॉगिंग, रनिंग, स्प्रिंट, रिटर्न टू प्ले संबंधी सराव सुरू करणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

आकाश दीपची ऑगस्टमध्ये वापसी?

बॅक इंजरीमुळं त्रासलेला आकाश दीप मागील वर्षभरात भारतीय कसोटी संघाचा महत्वाचा भाग म्हणून राहिला आहे. तो पुन्हा संघात कधी येईल याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. ऑगस्ट महिन्यात दलीप ट्रॉफीतून तो कमबॅक करू शकतो, असे सांगण्यात येत आहे. याशिवाय हर्षित राणा देखील मैदानात कधी उतरणार याबाबत निश्चित सांगता येत नाही. टीम इंडियासाठी आगामी मालिका महत्वाच्या आहेत. या दोन गोलंदाजांची उणीव संघाला नक्कीच भासणार आहे.

भारतीय संघ मायदेशात ६ जूनपासून अफगाणिस्तानच्या विरोधात एक कसोटी सामना खेळणार आहे. तर १४ ते २० जून या कालावधीत तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. त्यानंतर भारतीय संघ आयर्लंड आणि इंग्लंडच्या दौऱ्यावर रवाना होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कपडे फाडले, दगड उचलले, लाथा बुक्क्यांचा मारा! किल्ले सिंहगडावर भर पावसात तुफान राडा

भाजपला मोठा धक्का; प्रदेश उपाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा;राजकीय वर्तुळात खळबळ

कोकण हादरलं ! २२ वर्षीय महिला वनरक्षकाचा घरात आढळला मृतदेह; आंबोली परिसरात खळबळ

पाऊस गायब, पण छत्रीसाठी तुफान गर्दी! भाजप नेत्याच्या उपक्रमाची जोरदार चर्चा; खासगी सुरक्षारक्षक तैनात

Russia-Ukraine War: युक्रेनचा रशियावर मोठा हवाई हल्ला; क्षेपणास्त्र कारखाना उद्धवस्त

SCROLL FOR NEXT