team india twitter
क्रीडा

Team India News: टीम इंडियाकडे आहे युवराज सिंगसारखा मॅचविनर खेळाडू! एकहाती फिरवू शकतो सामना

Team India, ICC T20 World Cup 2024: भारतीय संघाला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे.

Ankush Dhavre

भारतीय संघाने २००७ मध्ये टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकली होती. तर २०११ मध्ये वनडे वर्ल्डकपच्या ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. या दोन्ही विजयांमध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने मोलाची भूमिका बजावली होती. भारतीय संघाने २००७ मध्ये पहिल्यांदाच या ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. त्यानंतर १७ वर्ष उलटून गेली आहेत.

मात्र अजूनही या संघाला विजय मिळवता आलेला नाही. सध्या भारतीय संघातील खेळाडू तुफान फॉर्ममध्ये असून, भारतीय संघाला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. दरम्यान भारतीय संघात असा खेळाडू आहे, जो भारतीय संघासाठी युवराज सिंगसारखीच भूमिका बजावू शकतो.

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २००७ स्पर्धेत युवराज सिंगने वादळी खेळी केली होती. त्याने इंग्लंडविरुद्ध सलग ६ षटकार खेचत वेगवान अर्धशतक झळकावलं होतं. यासह अनेक महत्वाच्या सामन्यांमध्ये त्याने महत्वपूर्ण खेळी केली होती. असाच काहीसा कारनामा सूर्यकुमार यादवही करु शकतो. सूर्यकुमार यादव सध्या टी-२० क्रिकेटमध्ये नंबर १ चा फलंदाज आहे. त्याच्यात आक्रमक खेळी करुन मोठी खेळी करण्याची क्षमता आहे.

सूर्यकुमार यादवने टी-२० क्रिकेटमध्ये यापूर्वीही अनेकदा महत्वपूर्ण खेळी करत संघाला विजय मिळवून दिला आहे.सूर्यकुमार यादवने भारतीय संघासाठी एकूण ६० सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ४५.५५ च्या सरासरीने २१४१ धावा केल्या आहेत. त्याच्या नावे १७ अर्धशतक आणि ४ शतकं झळकावण्याची नोंद आहे. मुख्य बाब म्हणजे तो वेगवान गोलंदाजांसह फिरकी गोलंदाजांनाही चांगल्याप्रकारे खेळून काढतो. त्यामुळे सूर्यकुमार यादव भारतीय संघासाठी एक्स फॅक्टर ठरु शकतो.

टी-२० वर्ल्डकपसाठी असा आहे भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल

राखीव खेळाडू..

शुभमन गिल, रिंकू सि्ंग, खलील अहमद, आवेश खान

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : कपड्याच्या दुकानातून पावणे चार लाखांची रोकड लंपास; चोरटे सीसीटीव्हीत कैद

Women Qualities: महिलांच्या या सवयीचं पुरूषांकडून होतं कौतुक, जिंकतात हृदय

Parenting Tips: मुलांना शिस्त लावायची आहे? मग पालकांनी ही चूक कधीच करु नका अन्यथा...

Maharashtra Election : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात दोन्ही सेनेचे शिवसैनिक आमनेसामने; पुढे नेमकं काय घडलं? वाचा

VIDEO : केलंय काम भारी, लुटली तिजोरी; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

SCROLL FOR NEXT