rohit sharma twitter
Sports

IND vs AUS: १४० कोटी भारतीयांच्या मनात अजूनही ती सल.. रोहितसेना कांगारुंचा वचपा काढणार?

India vs Australia Head To Head Record In ICC Knockouts: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील सेमीफायनलचा सामना रंगणार आहे.

Ankush Dhavre

आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचं यजमानपद भारताकडे होतं. यजमानांनी समोर येणाऱ्या प्रत्येक पाहूण्या संघाचा चांगलाच समाचार घेतला. जो संघ येईल, त्या संघाला धूळ चारत भारताने फायनल गाठली. यादरम्यान भारताने एकही सामना गमावला नव्हता. त्यानंतर स्पर्धेतील फायनलचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला.

भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ ट्रॉफी जिंकण्यासाठी मैदानात उतरले. ऑस्ट्रेलियाकडून ट्रेविस हेड भारताला नडला अन् भारताच्या हातून वर्ल्डकपची ट्रॉफी निसटली. भारतात जल्लोष करण्यासाठी १४० कोटी भारतीय सज्ज होते. पण एका पराभवामुळे सारं काही राहून गेलं. आता भारताकडे पराभवाचा बदला घेण्याची संधी असणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील पहिल्या सेमीफायनलचा सामना खेळण्यासाठी मैदानात येणार आहे. हा सामना ४ मार्चला दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये रंगणार आहे. साखळी फेरीतील तिन्ही सामने जिंकून भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे.

तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा संघ १ सामना जिंकून आणि २ सामने पावसामुळे रद्द झाल्यामुळे सेमीफायनलपर्यंत पोहोचला आहे. आता ऑस्ट्रेलियाला हरवून भारतीय संघाला फायनलमध्ये जाण्याची सुवर्णसंधी असणार आहे. मात्र हे मुळीच सोपं नसणार आहे. कारण आतापर्यंतचा जर रेकॉर्ड पाहिला, तर आयसीसीच्या स्पर्धांमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ नेहमीच भारतीय संघावर भारी पडला आहे.

आयसीसी स्पर्धेतील नॉकआऊटच्या सामन्यात जेव्हा जेव्हा ऑस्ट्रेलियाचा संघ भारतीय संघाला भिडला आहे, तेव्हा तेव्हा भारतीय संघ पिछाडीवर राहिला आहे. २०२३ वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील फायनलचा सामना कुठलाही क्रिकेट फॅन विसरु शकणार नाही.

स्पर्धेतील सर्व सामने जिंकून भारतीय संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. मात्र फायनलमध्ये भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे हातचा वर्ल्डकप निसटला होता. यावेळी ऑस्ट्रेलियाला हरवून भारतीय संघाकडे ही मालिका मोडण्याची संधी असणार आहे.

कसा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड?

आयसीसी वनडे नॉकआऊटमध्ये दोन्ही संघांचा रेकॉर्ड पाहिला, तर दोन्ही संघ ६ वेळेस आमनेसामने आले आहेत. यादरम्यान भारतीय संघाला ३ सामन्यांमध्ये बाजी मारता आली आहे. तर ३ सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने बाजी मारली आहे. हा रेकॉर्ड पाहिला, तर नॉकआऊट सामन्यांमध्ये दोन्ही संघ बरोबरीत आहेत.

भारत- ऑस्ट्रेलिया नॉकआऊट सामन्यातील रेकॉर्ड

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी, १९९८- भारतीय संघाचा विजय

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी, २०००- भारतीय संघाचा विजय

वर्ल्डकप फायनल, २००३- ऑस्ट्रेलियाचा विजय

वर्ल्डकप क्वार्टरफायनल, २०११ - भारतीय संघाचा विजय

वर्ल्डकप सेमीफायनल, २०१५ - ऑस्ट्रेलियाचा विजय

वर्ल्डकप फायनल, २०२३ - ऑस्ट्रेलियाचा विजय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! नोकरी करत केली UPSC क्रॅक; IAS नेहा यादव यांचा प्रेरणादायी प्रवास

Maharashtra Live News Update: पुण्यातील चारही धरणे जवळपास ९० टक्के भरली

Gaza News Today : गाझात उपासमारीने 124 जणांचा मृत्यू; 50 ग्रॅमचं बिस्किट 750 रुपयांना, VIDEO

Monday Horoscope : गणरायाची कृपा होणार,अचानक मोठा पैसा मिळवाल; ५ राशींचे लोक ठरणार भाग्यवान, वाचा राशीभविष्य

श्रावण सोमवारी पहाटे दुर्घटना, मंदिरात विजेची तार तुटल्याने चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू, 38 भाविक जखमी

SCROLL FOR NEXT