IND vs AUS, Super 8: टीम इंडियाला WC फायनलच्या पराभवाची परतफेड करण्याची संधी! ऑस्ट्रेलियाची एक्झिट कन्फर्म?
india vs australia google
क्रीडा | T20 WC

IND vs AUS, Super 8: टीम इंडियाला WC फायनलच्या पराभवाची परतफेड करण्याची संधी! ऑस्ट्रेलियाची एक्झिट कन्फर्म?

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील सर्वात मोठी लढत भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. ऑस्ट्रेलियासाठी हा सामना करो या मरो सामना असणार आहे. कारण या सामन्यात पराभूत होताच ऑस्ट्रेलियाचं सेमिफायनलमध्ये पोहोचणं कठीण होऊन जाईल. तर दुसरीकडे भारतीय संघाकडे वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील पराभवाचा बदला घेण्याची संधी असणार आहे.

ऑस्ट्रेलियाला बाहेर करण्यासाठी भारतीय संघाला काय करावं लागेल?

जर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं आणि अफगाणिस्तानने बांगलादेशला पराभूत केलं तर ऑस्ट्रेलियाचा संघ सेमिफायनलच्या शर्यतीतून बाहेर पडेल. याच ऑस्ट्रेलियन संघाने भारतीय संघाचा वनडे वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील फायनलमध्ये पराभव केला होता. त्यामुळे भारतीय संघाकडे या पराभवाचा बदला घेण्याची संधी असणार आहे.

ऑस्ट्रेलियाला अजूनही सेमिफायनलमध्ये जाण्याची संधी

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारा सामना हा सेमिफायनलच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ भारतीय संघाकडून पराभूत झाला तरीदेखील स्पर्धेत टिकून राहणार आहे. भारतीय संघाने जर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत विजय मिळवला तर भारतीय संघ सेमिफायनलसाठी पात्र ठरेल. तर ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्तानच्या विजयाची प्रार्थना करावी लागेल. यासह अफगाणिस्तानचा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल आणि नेट रनरेटच्या बळावर ऑस्ट्रेलियाचा संघ सेमिफायनलसाठी पात्र ठरेल.

पराभवाचा बदला घेण्याची संधी

भारतीय संघाला हा सामना जिंकून पराभवाची परतफेड करण्याची संधी असणार आहे. आयसीसीच्या स्पर्धांमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ भारतीय संघाला नेहमीच नडला आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील फायनलमध्ये भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parabhani Road News : आठ कोटी रुपयांचा रस्ता हाताना खरडून निघाला, परभणीतला धक्कादायक प्रकार

Dharmaveer 2 : CM एकनाथ शिंदे 'धर्मवीर २' चित्रपटात झळकणार? चर्चांना उधाण

Maharashtra Live News Updates : NDA सरकारचं ससंदेचं पहिलं विशेष अधिवेशन आज संपणार

Sambhajinagar News : कामावरून काढून टाकल्याचा राग, भररस्त्यात उद्योजकाला अमानुष मारहाण; ६ जणांविरोधात गुन्हा

Milk Farmer Protest News : गायीच्या दुधाला 35 रुपयांचा भाव, शेतकऱ्यांना दिलासा

SCROLL FOR NEXT