Team India Players Surprise Entry saam tv
Sports

Team India Players Comeback: निवृत्तीच्या वाटेवर असलेले 'हे' ३ खेळाडू वर्ल्ड कप खेळणार! BCCI देऊ शकते सरप्राईज एंट्री

Team India Prediction: दरम्यान ३ असे देखील खेळाडू आहेत ज्यांना भारतीय संघात सरप्राईज एंट्री मिळू शकते.

Ankush Dhavre

World Cup 2023 News: आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेचे आयोजन यावेळी भारतात केले जाणार आहे. बीसीसीआय आणि आयसीसीने या स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा देखील केली आहे. ५ ऑक्टोबर रोजी स्पर्धेतील पहिला सामना गतविजेत्या इंग्लंड आणि उपविजेत्या न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये पार पडणार आहे.

तर १५ ऑक्टोबर रोजी भारत - पाकिस्तान सामन्याचा थरार पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघाला विजयाचं प्रबळ दावेदार मानलं जात आहे.

त्यामुळे भारतीय संघ मजबूत खेळाडूंसह मैदानात उतरण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान ३ असे देखील खेळाडू आहेत ज्यांना भारतीय संघात सरप्राईज एंट्री मिळू शकते.

१) मोहित शर्मा:

आयपीएल २०२३ स्पर्धेत मोहित शर्माने दमदार कामगिरी केली होती. गुजरातला अंतिम फेरीत पोहचवण्यात मोहित शर्माने मोलाचे योगदान दिले होते. तो सुरुवातीच्या आणि अंतिम षटकांमध्ये उत्तम गोलंदाजी करू शकतो. आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी देखील भारतीय संघाला अशाच एका गोलंदाजाची गरज आहे.

जो भारतीय संघाला चांगली सुरुवात करून देऊ शकतो. तसेच अंतिम षटकात विकेट देखील काढून देऊ शकतो. यापूर्वी त्याने २०१४ टी-२० वर्ल्ड कप आणि २०१५ वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. आयपीएल २०२३ स्पर्धेत गोलंदाजी करताना त्याने १४ सामन्यांमध्ये २७ गडी बाद केले होते.

२) शिखर धवन:

आयसीसीच्या स्पर्धांमध्ये शिखर धवनचा रेकॉर्ड दमदार आहे. त्याचा हा रेकॉर्ड पाहता बीसीसीआय त्याला भारतीय संघात संधी देऊ शकते. भारतीय संघाने २०१३ मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत जेतेपदाला गवसणी घातली होती.

या स्पर्धेत शिखर धवनने सर्वाधिक धावा केल्या होत्या. तसेच महत्वाच्या सामन्यांमध्ये देखील त्याने महत्वाची खेळी करून संघाला विजय मिळवून दिला आहे. शिखर धवनला तिन्ही फॉरमॅटमधून बाहेर केलं गेलं असलं तरीदेखील तो केव्हाही भारतीय संघात कमबॅक करू शकतो. (Latest sports updates)

३) पियुष चावला:

यदांचा वर्ल्ड कप हा भारतात होणार आहे. भारतीय खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना मदत मिळत असते. हे पाहता युजवेंद्र चहलच्या जागी अनुभवी गोलंदाज पियुष चावलाला भारतीय संघात सरप्राईझ एंट्री दिली जाऊ शकते. पियुष चावलाने आयपीएल २०२३ स्पर्धेत २२ गडी बाद केले होते.

तो या हंगामात सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानी होता. तसेच त्याला २०११ वनडे विश्वचषक खेळण्याचा अनुभव देखील आहे. या अनुभवाचा भारतीय संघाला फायदा होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT