स्टार खेळाडू अक्षर पटेल आजारामुळे शेवटच्या दोन टी२० सामन्यांतून बाहेर
अक्षर पटेलविषयी बीसीसीआयकडून अधिकृतपणे घोषणा
अक्षर पटेलच्या ऐवजी शहबाज अहमदला संघात संधी
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी२० सीरीजसाठी शेवटच्या २ सामन्यासाठी अक्षर पटेल संघाबाहेर गेला आहे. सीरीजच्या तिसऱ्या सामन्यात अक्षर पटेल खेळला नव्हता. आता अक्षर पटेल संघाबाहेर गेल्याची अधिकृत माहिती बीसीसीआयने दिली.
बीसीसीआयने अधिकृत माहिती दिली की, दक्षिण आफ्रिकेविरोधात होणाऱ्या चौथ्या आणि पाचव्या टी२० सामन्यातून अक्षर पटेल बाहेर गेला आहे. अक्षर पटेल आजारी पडल्याने संघाबाहेर गेला आहे. चौथ्या आणि पाचव्या टी२० सामन्यासाठी अक्षर पटेलच्या ऐवजी आता संघात शहबाज अहमदला संधी मिळाली आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा चौथा टी२० सामना १७ डिसेंबर रोजी लखनौ येथे खेळवला जाणार आहे. तर सीरीजचा पाचवा आणि अंतिम सामना हा १९ डिसेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
तत्पूर्वी, जसप्रीत बुमराह खासगी कारणामुळे घरी गेला होता. त्यामुळे जसप्रीत बुमराह देखील तिसरा सामना खेळू शकला नव्हता. मात्र, पुढील दोन सामन्यात जसप्रीत बुमराह खेळताना दिसणार आहे.
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (विकेटकिपर), संजू सॅमसन (विकेटकिपर), वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद
अक्षर पटेल संघाबाहेर का गेला?
अक्षर पटेल आजारी पडलाय. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या दोन टी२० सामन्यांतून बाहेर गेलाय.
अक्षर पटेलच्या जागी कोणाला संधी मिळाली?
अक्षर पटेलच्या जागी संघात शहबाज अहमदला संधी मिळाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.