Team india fined by icc  saam tv
क्रीडा

Team India Fined By ICC: टीम इंडियाला ‘डबल ट्रबल’! विंडीज विरूद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर ICC ने केली मोठी कारवाई

Ankush Dhavre

Indian Cricket Team Fined By ICC:

भारत आणि वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये ३ टी -२० सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ झाला आहे. मालिकेतील पहिला टी -२० सामना त्रिनिदादच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला ४ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे.

यासह वेस्टइंडीज संघाने मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे. दरम्यान या पराभवानंतर भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.

पहिल्या टी -२० सामन्यानंतर आयसीसीने दोन्ही संघांवर कारवाई केल्याचे पाहायला मिळाले आहे. दोन्ही संघ निर्धारित वेळेत २० षटके पूर्ण करू शकले नाहीत. भारतीय संघाने १ तर वेस्टइंडीजने २ षटके उशिराने फेकली आहेत. त्यामुळे आयसीसीने भारतीय खेळाडूंवर मॅच फीच्या ५ टक्के तर वेस्टइंडीज संघातील खेळाडूंवर मॅच फीच्या १० टक्के दंड आकारण्यात आला आहे.

सामना झाल्यानंतर रेफ्री रिची रिचर्डसन यांनी दोन्ही संघांच्या कर्णधारांना याबाबत माहिती दिली. आयसीसी आचारसंहितेच्या कलम २.२२ नुसार, स्लो ओव्हरसाठी मॅच फीच्या ५ टक्के दंड आकारला जातो. हा दंड 50 टक्क्यांपर्यंत असू शकतो. भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या आणि वेस्टइंडीजचा कर्णधार रोमेन पॉवेलने या दंडाचा स्वीकार देखील केला आहे. (Latest sports updates)

भारतीय संघाचा पराभव...

या सामन्यात वेस्टइंडीज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना वेस्टइंडीज संघाने २० षटक अखेर १४९ धावा केल्या होत्या. त्यामुळे भारतीय संघाला विजय मिळवण्यासाठी भारतीय संघाला १५० धावांची गरज होती.

या धावांचा पाठलाग करताना पदार्पणवीर तिलक वर्माने सर्वाधिक ३९ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने २ चौकार आणि ३ षटकार मारले.

तर सूर्यकुमार यादवने २१ आणि कर्णधार हार्दिक पंड्याने १९ धावांचे योगदान दिले. भारतीय संघाला या डावात अवघ्या १४५ धावा करता आल्या. हा सामना ४ धावांनी जिंकून वेस्टइंडीज संघाने १-० ची आघाडी घेतली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Festival: दिवाळीला दारात तेलाचा की तुपाचा दिवा लावावा?

Maharashtra Politics : आणखी एक भाजप आमदार तुतारी हाती घेणार ? महत्वाची माहिती आली समोर

Maharashtra Politics: गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई, नागपूरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

Maharashtra News Live Updates: विधानसभेसाठी पुण्यात मनसेचे उमेदवार तयार?

Bee Attack : शेतात काम करताना मधमाश्यांचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, पत्नी जखमी

SCROLL FOR NEXT