Team India Squad For World Cup 2023: भारतात यावेळी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेसाठी वेळापत्रक देखील जाहिर करण्यात आले आहे. ठरलेल्या वेळापत्रकानुसार भारतीय संघाचा पहिला सामना ८ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया संघाविरूद्ध रंगणार आहे.
या स्पर्धेची घोषणा होताच सर्वांना एकच प्रश्न सतावतोय, तो म्हणजे भारतीय संघात कोणाला स्थान मिळणार. चला तर जाणून घ्या वर्ल्डकप २०२३ स्पर्धेसाठी कोणत्या १५ खेळाडूंना मिळणार स्थान.
रोहित शर्मा करणार नेतृत्व..
आगामी वनडे वर्ल्डकप स्पर्धेत रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसून येऊ शकतो. यासह डावाची सुरूवात करण्याची जबाबदारी देखील रोहित शर्मावर असणार आहे. रोहित शर्माला साथ देण्यासाठी शुबमन गिल मैदानावर येऊ शकतो.
या दोघांवर संघाला चांगली सुरूवात करण्याची जबाबदारी असणार आहे. तर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येणार यात काही शंकाच नाही. विराट कोहलीसह रविंद्र जडेजा,हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि युझवेंद्र चहल यांना देखील संघात स्थान मिळणं जवळजवळ निश्चित आहे.
हा खेळाडू होणार बाहेर..
तर काही खेळाडूंच्या खेळण्यावर प्रश्रचिन्ह उपस्थित आहे. संघातील प्रमुख खेळाडू केएल राहुल आणि श्रेएस अय्यर दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत.
जर हे दोघेही पूर्णपणे फिट असतील तर युवा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनला संघात स्थान मिळणं कठीण आहे. कारण केएल राहुल अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज आहे. त्याचा अनुभव पाहता त्याला संधी मिळु शकते. (Latest sports updates)
जसप्रीत बुमराहचे होणार पुनरागमन...
भारतीय संघातील अनुभवी फलंदाज जसप्रीत बुमराह गेल्या काही महिन्यांपासून संघाबाहेर आहे. तो सप्टेंबर २०२२ मध्ये आपला शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता.नुकताच आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यावर जसप्रीत बुमराह कमबॅक करताना दिसून येणार आहे. या मालिकेसाठी त्याची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे.
आगामी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेसाठी या १५ खेळाडूंना मिळू शकते संधी..
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक)/ईशान किशन, रविंद्र जड़ेजा, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, जसप्रीत बुमराह , संजू सॅमसन, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.