team india debutants performance in india vs england test series sarfaraz khan dhruv jurel devdutt padikkal  twitter
Sports

IND vs ENG 5th Test: सरफराज ते जुरेल! कशी राहिली इंग्लंडविरुद्ध पदार्पण करणाऱ्या पाचही खेळाडूंची कामगिरी ? वाचा सविस्तर

Team India Debutants Performance In IND vs ENG Test Series: धरमशालेच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमधील पाचवा कसोटी सामना पार पडला. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारतीय संघाने १ डाव आणि ६४ धावांनी विजय मिळवला.

Ankush Dhavre

India vs England Test Series:

धरमशालेच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमधील पाचवा कसोटी सामना पार पडला. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारतीय संघाने १ डाव आणि ६४ धावांनी विजय मिळवला. तब्बल ११२ वर्षांनंतर कुठल्याही संघाने ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर पुढील ४ सामने जिंकले आहेत. हा विजय भारतीय संघासाठी अतिशय खास ठरला आहे.

कारण बलाढ्य इंग्लंडविरुद्ध खेळताना भारतीय संघात मोहम्मद शमी, विराट कोहली आणि केएल राहुल सारखे अनुभवी शिलेदार नव्हते. तरीदेखील पहिला कसोटी सामना सोडला, तर पुढील चारही सामन्यांमध्ये भारतीय खेळाडूंनी इंग्लडच्या खेळाडूंना बॅकफुटवर ठेवलं. दरम्यान या मालिकेत ५ युवा खेळाडूंना भारतीय संघाकडून पदार्पण करण्याची संधी दिली गेली.

इंग्लंडच्या अनुभवी खेळाडूंना भारताच्या यंग ब्रिगेडने हरवलं असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. कारण मालिका सुरु होण्यापूर्वीच विराटने मालिकेतून माघार घेतली. तर मोहम्मद शमी दुखापतीमुळे संघाबाहेर झाला आणि केएल राहुल पहिल्या कसोटीनंतर दुखापतीमुळे उर्वरीत सामने खेळू शकला नाही. त्यामुळे युवा खेळाडूंना पदार्पण करण्याची संधी मिळाली.

विराट कोहलीच्या जागी रजत पाटीदारला भारतीय संघात स्थान दिलं गेलं होतं. मालिकेतील पहिल्या सामन्यात केएल राहुल विराटच्या जागी खेळण्यासाठी मैदानावर उतरला. मात्र तो दुखापतग्रस्त झाल्यानंतर रजत पाटीदारला पदार्पण करण्याची संधी दिली गेली. मात्र त्याला या संधीचा दोन्ही हातांनी स्वीकार करता आला नाही. पाटीदारला ३ सामन्यांमध्ये केवळ ६५ धावा करता आल्या. (Cricket news in marathi)

पाटीदार फ्लॉप ठरला असला तरीदेखील सरफराज खान सुपरहीट ठरला. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात पदार्पण करणाऱ्या सरफराज खानने ३ सामन्यांमध्ये २०० धावा केल्या. याच सामन्यात ध्रुव जुरेलला देखील पदार्पणाची संधी दिली गेली होती. या संधीचा फायदा घेत त्याने ३ सामन्यांमध्ये १९० धावा केल्या.

मालिकेतील चौथ्या कसोटीत आकाशदीपला पदार्पण करण्याची संधी दिली गेली होती. पहिल्याच सामन्यात त्याने इंग्लंडच्या ३ फलंदाजांना बाद करत माघारी धाडलं होतं. पुढील सामन्यात बुमराहच्या पुनरागमनामुळे त्याला प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळालं नाही. तर शेवटच्या कसोटीत देवदत्त पडिक्कलला पदार्पणाची संधी दिली गेली. या संधीचा फायदा घेत त्याने पहिल्याच डावात ६५ धावांची खेळी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वर्ध्यात वीज पडून दोन ठार, एक गंभीर

Ajit Pawar: मागच्या आणि आताच्या अजित पवारांमध्ये खूप फरक; उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का, ICC ने सूर्यावर केली मोठी कारवाई

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

SCROLL FOR NEXT