team india twitter
क्रीडा

Team India News: पाकिस्तानच्या विजयासाठी टीम इंडिया करणार प्रार्थना; सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी कसं असेल समीकरण?

Ankush Dhavre

Team India Semi Final Scenario In ICC Women's T20 World Cup 2024: भारतीय संघाला साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. हा सामना जिंकून भारतीय संघाला सेमीफायनलमध्ये जाण्याची सुवर्णसंधी होती.

मात्र आता भारतीय संघाचं टेन्शन वाढलं आहे. भारतीय संघाला सेमीफायनलचं तिकीट मिळवण्यासाठी आता न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्याच्या निकालावर अवलंबून राहावं लागणार आहे.

जर न्यूझीलंडने पाकिस्तानला पराभूत केलं, तर भारतीय संघाचा या स्पर्धेतील प्रवास इथेच समाप्त होईल. तर पाकिस्तानने न्यूझीलंडला पराभूत केलं, तर भारतीय संघाचा सेमीफायनलमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

समीकरण समजून घेण्याआधी गुणतालिकेतील स्थिती काय आहे, हे समजून घ्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाला ९ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवानंतर +०.३२२ नेट रनरेटसह भारतीय संघ दुसऱ्या स्थानी कायम आहे.

तर न्यूझीलंडचा संघ तिसऱ्या स्थानी आहे. मात्र भारतीय संघाचा नेट रनरेट हा न्यूझीलंडपेक्षा चांगला आहे. तर पाकिस्तानचा संघ या यादीत चौथ्या स्थानी आहे. पाकिस्तानचा नेट रनरेट -०.४८८ इतका आहे. त्यामुळे अजूनही ४ संघांमध्ये सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी चुरस सुरु आहे.

कसं असेल समीकरण?

भारत आणि न्यूझीलंडसह पाकिस्तानचाही सेमीफायनलमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा आहे. आज होणाऱ्या सामन्यात जर पाकिस्तानने न्यूझीलंडला ५३ पेक्षा अधिक धावांनी पराभूत केलं किंवा फलंदाजी करताना ९.१ षटकात दिलेलं आव्हान पूर्ण केलं, तर भारत आणि न्यूझीलंडला मागे सोडून पाकिस्तानचा संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करु शकतो.

त्यामुळे भारतीय संघाला पाकिस्तानच्या विजयाची प्रार्थना करण्यासह अशीही प्रार्थना करावी लागेल की, पाकिस्तानने हा सामना कमी फरकाने जिंकायला हवा. या दोन्ही संघांचा हेट टू हेड रेकॉर्ड पाहिला, पाकिस्तान आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आतापर्यंत ११ वेळेस आमनेसामने आले आहेत.

यादरम्यान पाकिस्तानला केवळ २ सामने जिंकता आले आहेत. तर न्यूझीलंडने ९ सामन्यांमध्ये बाजी मारली आहे. टी-२० वर्ल्डकप स्पर्धत या दोन्ही संघांचा रेकॉर्ड पाहिला, तर दोन्ही संघ ३ वेळेस आमनेसामने आले आहेत. यादरम्यान तिन्ही सामन्यांमध्ये न्यूझीलंडने पाकिस्तानला धूळ चारली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : हत्यांच्या घटनांनी अमरावती शहर हादरले

Diwali Special Dessert Recipe: थंडाई वापरुन घरच्या घरी बनवा शेवयांची 'ही' खास रेसिपी

रजोनिवृत्तीचा हाडं-हृदयाच्‍या आरोग्‍यावर होतो परिणाम; तज्ज्ञांनी स्पष्ट केलं कसा होतो परिणाम

Manoj Jarange Patil : 'आमचं वाटोळं करून तुम्हाला पुढे जाऊ देणार नाही'; जरांगेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा !

Salman Khan: सलमान खानचं पूर्ण नाव काय? तुम्हाला माहितीये का

SCROLL FOR NEXT