team india twitter
Sports

IND vs ENG, Semi Final: टीम इंडियाला थेट फायनलचं तिकीट मिळणार? समोर आली मोठी अपडेट

India vs England, Semi Final Scenario: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०३४ स्पर्धेतील सेमिफायनलच्या सामन्यात भारत आणि इंग्लंड हे दोन्ही आमनेसामने येणार आहेत.

Ankush Dhavre

आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत भारतीय संघाचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. आतापर्यंत भारतीय संघाने या स्पर्धेतील एकही सामना गमावलेला नाही. साखळी फेरीतील ३ आणि सुपर ८ फेरीतील ३ सामने जिंकत भारतीय संघाने सेमिफायनलचं तिकीट मिळवलं आहे. अतिशय महत्वाच्या अशा सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पाणी पाजलं. दरम्यान या विजयासह भारतीय संघाने सेमिफायनलचं तिकीट मिळवलं आहे.

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत आतापर्यंत अनेक उलटफेर पाहायला मिळाले आहेत. सुपर ८ फेरीतील सामन्यात अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला. या विजयाचा भारतीय संघाला फायदा झाला. ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि बांगलादेशला पराभूत करून भारतीय संघ सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे.

भारतीय संघ अव्वल स्थानी

भारतीय संघ सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. त्यामुळे भारतीय संघाचा सामना ग्रूप १ मध्ये दुसऱ्या स्थानी असलेल्या इंग्लंडविरुद्ध होईल. तर दुसऱ्या सेमिफायनलमध्ये दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहे. अफगाणिस्तानने करो या मरो लढतीत बांगलादेशला धूळ चारली आहे. भारतीय संघासाठी गुड न्यूज आणि इंग्लंडचं टेन्शन वाढवणारी बाब म्हणजे, या सामन्यावर पावसाचं सावट आहे.

आयसीसीने वेळापत्रक जाहीर केलं त्यावेळीच सेमिफायनलच्या सामन्यांबाबत अपडेट दिली होती. पहिल्या सेमिफायनलचा सामना २६ जून रोजी होणार आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानचा सामना होणार आहे. या सामन्यात जर पावसाने अडथळा निर्माण केला, तर २७ जून हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.

भारतीय संघाचा सेमिफायनलचा सामना २८ जून रोजी इंग्लंडविरुद्ध होणार आहे. या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे सामना रद्द झाल्यास भारतीय संघ थेट फायनलमध्ये प्रवेश करेल. कारण भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल आहे. त्यामुळे पावसामुळे सामना रद्द झाल्याचा फायदा हा भारतीय संघाला होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

युतीसाठी ठाकरेसेनेचं रोखठोक,ठाकरेंचा चेंडू शिवतीर्थच्या कोर्टात,राज ठाकरेंचे मौन कधी सुटणार?

Mumbai : मुंबईत हवालदारानं स्वत:ला संपवलं, घरात संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

कुलूपबंद मदिरा, रोखल्या नजरा,मद्यपींचे होणार वांदे, सोमवारी ड्राय डे?

Pravin Gaikwad : प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरणी मोठी अपडेट; दीपक काटेंसह 7 जणांवर अक्कलकोटमध्ये गुन्हा

Ind Vs End : भारतासमोर इंग्लंडचा संघ ढेर, टीम इंडियाला लॉर्ड्सवर इतिहास रचण्याची संधी, विजयासाठी किती धावांचे लक्ष्य?

SCROLL FOR NEXT