Team India celebrates series win against New Zealand as star batsman makes a strong comeback ahead of T20 World Cup. saam tv
Sports

T20 वर्ल्ड कपपूर्वी आनंदाची बातमी; टीम इंडियाच्या धुरंधर फलंदाजाची वापसी, किवींची आता खैर नाही

Tilak Varma Fitness: २०२६ च्या टी-२० विश्वचषकापूर्वी टीम इंडिया टी-२० मालिकेत न्यूझीलंडवर वर्चस्व गाजवलंय.त्यात आणखी एक स्टार फलंदाज पुनरागमन करणार असल्यानं किवींच्या संघाची चिंता वाढलीय.

Bharat Jadhav

  • टी20 वर्ल्ड कप 2026 पूर्वी टीम इंडियाला मोठा दिलासा

  • न्यूझीलंडविरुद्ध टी20 मालिकेत भारताचा 3-0 ने विजय

  • भारतीय फलंदाजांची आक्रमक आणि आत्मविश्वासपूर्ण कामगिरी

टी20 वर्ल्ड कपपूर्वी झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत टीम इंडियानं ३-० असा विजय मिळवला. भारतीय संघाने या विजयासह विश्व कप स्पर्धेतील आपली दावेदारी ठोकलीय. या ऐतिहासिक कामगिरीतून भारतीय क्रिकेट संघाने अनेक संघांचे टेन्शन वाढवलंय. पहिला सामना वगळता संघाने इतर दोन्ही सामने एकतर्फी जिंकले. गेल्या रविवारी, संघाने १५४ धावांचे लक्ष्य फक्त १० षटकांत पूर्ण केलं.

या सामन्यामध्ये अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन यांनी जबरदस्ती फलंदाजी केलीय. त्यात आता आणखी एका धुरंधर फलंदाजाची वापसी झाली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिका सुरू होण्यापूर्वी तिलक वर्मा दुखापतग्रस्त झाला होता. विशेष म्हणजे तिलक वर्मा हा २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या संघातील एक खेळाडू आहे. पण पोटाच्या समस्येमुळे संघाबाहेर होता.

संघात अभिषेक शर्मा, इशान किशन,सूर्यकुमार यादवसारखे स्फोटक फलंदाज आहेत, परंतु भारतीय संघाची ताकद असलेली टॉप ऑर्डर फ्लॉप झाली तर मधली फळी उपयोगी पडते. मधल्या फळीतील फलंदाज धावगती लक्षात घेऊन चांगली फलंदाजी करतात. हादिक पंड्या आणि तिलक वर्मा हे असेच मधल्या फळीतील फलंदाज आहेत.

तिलक वर्मा पाचवा टी२० सामना खेळणार

इंडियन एक्सप्रेसमधील वृत्तानुसार, तिलक वर्मा ३१ जानेवारी रोजी तिरुवनंतपुरम येथे न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी२० सामन्यासाठी उपलब्ध असणार आहे. विजय हजारे ट्रॉफी दरम्यान त्याच्या पोटावर शस्त्रक्रिया झाली, त्यानंतर डॉक्टरांनी त्याला दोन आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. तो बेंगळुरूमधील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये तंदुरुस्त होण्यासाठी कठोर परिश्रम करत आहे. परंतु संघ व्यवस्थापन तिलकच्या पुनरागमनाची घाई करू इच्छित नाही, त्याऐवजी त्यांना तिलक २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी पूर्णपणे तंदुरुस्त झालेला हवा आहे.

बीसीसीआयने यापूर्वीच सांगितले होते की तिलक वर्मा याने आधीच शारीरिक प्रशिक्षण सुरू केले आहे. त्यांची लक्षणे पूर्णपणे बरी झाल्यानंतर आणि बरे होण्याची प्रक्रिया समाधानकारक झाल्यानंतर तो हळूहळू कौशल्य-आधारित एक्टिविटीजमध्ये परत येईल. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी त्याच्याबद्दल सांगितले होते की, तो न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या ३ सामन्यांमधून बाहेर आहे. उर्वरित २ सामन्यांसाठी त्याच्या उपलब्धतेचा निर्णय त्याच्या प्रशिक्षण आणि कौशल्य टप्प्यातील प्रगतीच्या आधारे घेतला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: गणेश नाईक प्रकरणावरून महायुतीत वादाची ठिणगी; शिंदे गटाचे नेते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार मारामारी

Kolkata Nazirabad Fire: नझीराबादेतील एका गोदामाला भीषण आग; बंद गोडाऊनमध्ये अडकले मजूर, ७ जणांचा मृत्यू

Anjali Arora Boyfriend: एक गंभीर आरोप आणि अटक; 'कच्चा बदाम' फेम अंजली अरोराच्या बॉयफ्रेंड पोलिसांच्या ताब्यात

Hyderabad Tourism : हैदराबादमध्ये वसलंय हृदयाच्या आकाराचे तलाव, नजर जाईल तिथपर्यंत दिसले निसर्ग सौंदर्य

गिरीश महाजनांना प्रजाकसत्ताक दिनाचं भाषण भोवणार; प्रकाश आंबेडकरांनी घेतली आक्रमक भूमिका

SCROLL FOR NEXT