IND vs NZ 3T20 : वनडे मालिकेतील पराभवाचा वचपा काढला; ८ विकेट्सने जिंकला तिसरा टी-२० सामना

India (IND) vs New Zealand (NZ): भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरा टी-२० सामना रविवारी खेळवण्यात आला. टीम इंडियाने हा सामना ८ विकेट्सने जिंकला आहे.
Abhishek Sharma and Suryakumar Yadav celebrate India’s dominant win against New Zealand in the 3rd T20I at Guwahati.
Abhishek Sharma and Suryakumar Yadav celebrate India’s dominant win against New Zealand in the 3rd T20I at Guwahati.
Published On
Summary
  • भारताने न्यूझीलंडवर ८ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला

  • अभिषेक शर्माचा १४ चेंडूंतील झंझावाती अर्धशतक

  • सूर्यकुमार यादवची सलग दुसरी अर्धशतकी खेळी

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरा टी-२० सामना रविवारी खेळवण्यात आला. हा टीम इंडियाने ८ विकेट्सने जिंकला. या विजयासह मालिकाही जिंकली आहे. हा सामना गुवाहाटीतील बारासापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

न्यूझीलंडने १५४ धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे भारताने फक्त १० षटकांत पूर्ण केले. दिलासादायक बाब म्हणजे सूर्यकुमार यादवने सलग दुसऱ्या टी २० सामन्यात अर्धशतक झळकावलं. सलामीवीर अभिषेक शर्मानं १४ बॉलमध्ये अर्धशतक ठोकलं. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या टी२०मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.

Abhishek Sharma and Suryakumar Yadav celebrate India’s dominant win against New Zealand in the 3rd T20I at Guwahati.
IND vs NZ: तिसऱ्या टी-२० साठी भारताच्या प्लेइंग ११ मध्ये होणार मोठे बदल; २ खेळाडूंना मिळणार बाहेरचा रस्ता

न्युझीलंडच्या संघाने दिलेल्या १५४ धावांच्या प्रत्युत्तरात टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. संजू सॅमसन पहिल्याच चेंडूवर बाद झाला. मॅट हेन्रीने त्याची विकेट घेतली. पण त्यानंतर इशान किशन फॉर्ममध्ये होता. त्याने १३ चेंडूत २८ धावा केल्या. यात तीन चौकार आणि दोन षटकार मारले. चौथ्या षटकात किशनची विकेट पडली, पण तोपर्यंत टीम इंडियाने ५० धावा पूर्ण केल्या होत्या. किशन बाद झाल्यानंतर अभिषेक शर्माने धमाकेदार खेळ केला.

Abhishek Sharma and Suryakumar Yadav celebrate India’s dominant win against New Zealand in the 3rd T20I at Guwahati.
BCCI central contract: BCCI सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून A+ कॅटेगिरी करणार सस्पेंड? विराट-रोहितच्या निर्णयामुळे होणार मोठा बदल

त्याने फक्त १४ चेंडूत अर्धशतक ठोकले. सातव्या षटकात भारताचा धावसंख्या १०० च्या पुढे गेली. त्यानंतर सूर्यकुमार यादवची बॅट तळपली होती. त्याने २५ चेंडूत अर्धशतक ठोकले. भारताने अवघ्या १० षटकांत सामना जिंकला. सूर्याने २६ चेंडूत नाबाद ५७ धावा केल्या, तर अभिषेकने २० चेंडूत नाबाद ६८ धावा केल्या. अभिषेकने त्याच्या डावात ७ चौकार आणि ५ षटकार मारले, तर सूर्याने ६ चौकार आणि ३ षटकार मारले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com