Team India Announced Saam tv
Sports

Team India Announced: टी२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; मंधानाची जोरदार एन्ट्री, संघात कोणाला मिळालं स्थान?

Team India Announced for series : टी२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात स्मृती मंधानाची जोरदार एन्ट्री होणार आहे.

Vishal Gangurde

श्रीलंकेविरुद्ध टी२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

हरमनप्रीत कौर कर्णधार तर स्मृती मंधाना उपकर्णधार

वर्ल्डकप विजयानंतर टीम इंडिया पहिल्यांदाच मैदानात उतरणार

वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडिया लवकरच मैदानात उतरणार आहे. विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडिया डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात श्रीलंकेच्या विरोधात टी२० मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने संघाची घोषणा केली आहे. मालिकेसाठी हरमनप्रीत कौरकडे ५ सामन्यात कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर मालिकेसाठी १५ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. तर स्मृती मंधाना उपकर्णधार म्हणून खेळताना दिसेल. ही मालिका २१ डिसेंबरपासून सुरु होईल.

वर्ल्डकप जिंकल्यानंतर टीम इंडिया सुट्टीवर होती. भारताचे काही महिला खेळाडू देशांतर्गत क्रिकेट सामन्यात खेळत होते. संघातील अनेक खेळाडूंनी आराम करण्याचा निर्णय घेतला होता. टीम इंडियाची सुट्टी आता लवकरच संपणार आहे. कारण आता टीम इंडिया श्रीलंकेविरोधात ५ सामन्यांची मालिका खेळणार आहे. वर्ल्डकप जिंकल्यानंतर टीम इंडिया श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे.

श्रीलंकेच्या विरोधात खेळणाऱ्या टीममध्ये वर्ल्डकपमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंचा समावेश आहे. या संघात स्मृती मंधानाचे देखील नाव आहे. काही दिवसांपूर्वी मंधानाने लग्न मोडल्याचे जाहीर केलं. तिचं २३ नोव्हेंबर रोजी पलाश मुच्छलसोबत लग्न ठरलं होतं. मात्र, काही कारणात्सव लग्न पुढे ढकलण्यात आलं.

पुढे २ आठवड्यांनी मंधानाने लग्न मोडल्याचे जाहीर केलं. एकीकडे वैयक्तिक आयुष्यात मोठा निर्णय घेतलाय. तर दुसरीकडे मंधाना आता क्रिकेटच्या मैदानावर उतरणार आहे. या संघात मंधानाकडे उपकर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

टी20 सीरीजसाठी संघातील खेळाडू

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, जेमिमा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, हरलीन देओल, अमनजोत कौर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, रेणुका सिंह, ऋचा घोष, जी कमलिनी, श्री चरणी, वैष्णवी शर्मा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरेंच्या मनसेचे २ उमेदवार गायब? राजकीय वर्तुळात खळबळ

कल्याणमध्ये मोठी राजकीय घडामोड; दोन दिग्गज नेत्यांची एकत्र बैठक, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

ऐन निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; बड्या नेत्याचा शिवसेनेला 'जय महाराष्ट्र'

Ladki Bahin eKYC: थर्टी फर्स्टची डेडलाईन तरी ई-केवायसी सुविधा सुरूच; लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक घोळ?

Friday Horoscope : नव्या वर्षाचा पहिला शुक्रवारी ठरेल लकी; जुळणार प्रेमाच्या रेशीम गाठी, ५ राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार

SCROLL FOR NEXT