IPL 2021: ...म्हणून तालिबानने अफगाणिस्तानात IPL प्रसारणावर लावली रोक
IPL 2021: ...म्हणून तालिबानने अफगाणिस्तानात IPL प्रसारणावर लावली रोक Saam TV
क्रीडा | IPL

IPL 2021: ...म्हणून तालिबानने अफगाणिस्तानात IPL प्रसारणावर लावली रोक

वृत्तसंस्था

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) पासून अफगाणिस्तानमधील चाहत्यांना या हंगामाला मुकावे लागणार आहे. तालिबानच्या नवीन राजवटीने आयपीएलच्या प्रसारणावर अफगाणिस्तानमध्ये बंदी घातली आहे. आयपीएल 2021 रविवारपासून (19 सप्टेंबर) यूएईमध्ये पुन्हा सुरू झाली आहे. दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गतविजेता मुंबई इंडियन्स यांच्यात पार पडला. यामध्ये चेन्नईने मुंबईला हारवत मागच्या पराभवाचा बदला घेतला आहे.

'इस्लाम विरोधी गोष्टींमुळे' आयपीएल २०२१ अफगाणिस्तानमध्ये दाखवले जाणार नाही असा निर्णय तालीबानने घेतला आहे. तालीबानच्या मते आयपीएल दरम्यान इस्लाम विरोधी गोष्टींचा पुरस्कार केला जातो. अफगाणिस्तानचे स्टार खेळाडू राशिद खान, मोहम्मद नबी आणि मुजीब उर रहमान हे आयपीएलचा भाग आहेत. तालीबानने बहूतेक मनोरंजक गोष्टींना अफगाणिस्तानमध्ये रोक लावली आहे. यामध्ये बहूतेक खेळ देखील आहेत. तालीबानने महिलांना खेळात भाग घेण्यापासून पूर्णपणे बंदी घातली आहे.

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डचे पूर्व मीडिया मॅनेजर आणि पत्रकार एम इब्राहिम मोमंद ट्विट करुन म्हणाले इस्लाम विरोधी गोष्टी, महिलांचे नृत्य त्याचबरोबर महिलांच्या उपस्थीतीमध्ये होणारी आयपीएल यामुळे अफगाणिस्तानमध्ये आयपीएलवर बंदी घातली आहे. याआधी ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट प्रमुखांनी दोन देशांमधील ऐतिहासिक कसोटी रद्द करण्याची धमकी दिली होती. कसोटी सामना नोव्हेंबरमध्ये खेळला जाणार आहे. अफगाणिस्तानमध्ये महिलांच्या खेळण्यावर बंदी असल्यामुळे ऑस्ट्रेलियाने असे म्हटले आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याविरोधात भाजप युवा मोर्चा आक्रमक; नागपुरातील निवास्थानाबाहेर निदर्शने

Today's Marathi News Live : मराठी भाषेला मागच्या १० वर्षांपासून मोदी सरकारने अभिजात दर्जा दिला नाही; जयराम रमेश

Mumbai News: नोकरीसाठी मराठी माणूस नको,पोस्ट व्हायरल झाल्यानंतर कंपनीने मागितली माफी; काय आहे प्रकरण

Dia Mirza : हँसता हुआ नूरानी चेहरा; काली ज़ुल्फ़ें रंग सुनहरा...

Skin Care Tips: चमकदार त्वचेसाठी तांदळाच्या पाण्याचे फायदे; जाणून घ्या

SCROLL FOR NEXT