Suryakumar Yadav, ICC Ranking  SAAM TV
Sports

Suryakumar Yadav : ICC रँकिंगमध्ये सूर्यकुमार यादवचं अव्वल स्थान कायम, 'विराट' विक्रम मोडणार

आयसीसीच्या टी २० फलंदाजांच्या क्रमवारीत सूर्यकुमार यादव पहिल्या स्थानी कायम आहे.

Nandkumar Joshi

Suryakumar Yadav ICC Ranking : आयसीसीने टी २० आंतरराष्ट्रीय फलंदाजांची नवी रँकिंग प्रसिद्ध केली आहे. भारताचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव सलग दुसऱ्या आठवड्यात अव्वल स्थानी विराजमान आहे. गेल्या सात दिवसांत दुसऱ्यांदा सूर्यकुमार यादव हा अव्वल स्थानी आहे.

मिस्टर ३६० डीग्री म्हणून ओळखल्या जाणारा सूर्यकुमार यादव टी २० वर्ल्डकपमधील कामगिरीमुळं चमकतो आहे. आयसीसीच्या टी २० फलंदाजांच्या रँकिंगमध्ये २ नोव्हेंबरला तो पहिल्यांदा अव्वल स्थानी विराजमान झाला होता. आता सात दिवसांत म्हणजेच ९ नोव्हेंबरला आयसीसीनं प्रसिद्ध केलेल्या रँकिंगमध्ये आपलं अव्वल स्थान त्यानं कायम राखलं आहे. (Cricket News)

सूर्यकुमार यादवनं (Suryakumar Yadav) पहिल्यांदा अव्वल स्थानी झेप घेतली त्यावेळी त्याचे रेटिंग पॉइंट ८६३ होते. आता त्याने त्यात आणखी सात गुणांची भर टाकली आहे.

आयसीसीनं प्रसिद्ध केलेल्या नव्या रँकिंगमध्ये सूर्यकुमार यादव ८६९ रेटिंग पॉइंटसह अव्वल स्थानी आहे. दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान आहे. त्याचे रेटिंग पॉइंट ८३० झाले आहेत. आता सूर्यकुमार आणि रिझवानच्या रेटिंग पॉइंटमध्ये ३९ गुणांचा फरक आहे.

तिसऱ्या स्थानी न्यूझीलंडचा ड्वेन कॉनवे आहे. अव्वल १० फलंदाजांच्या यादीत सूर्यकुमार वगळता अन्य कोणताही भारतीय फलंदाज नाही. तर पाकिस्तानचा बाबर आझम हा चौथ्या स्थानी घसरला आहे.

विराट कोहलीचाही रेकॉर्ड मोडणार

विराट कोहली आयसीसी टी २० फलंदाजांच्या रँकिंगमध्ये सर्वाधिक ८९७ रेटिंग पॉइंट मिळवणारा फलंदाज आहे. सूर्यकुमार यादव सध्या या विक्रमापासून २८ गुणांनी पिछाडीवर आहे. सूर्यकुमारचा फॉर्म बघता विराट कोहलीचा हा विक्रम लवकरच मोडेल, असे दिसते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Nagar Palika Election Result Live : लातूरच्या उदगीरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ४ उमेदवार विजयी

Attraction Sign: समोरची व्यक्ती तुम्हाला आकर्षित करतेय, हे कसं ओळखायचं?

Samosa Roll Recipe : 2 मिनिटांत बनतील 16 समोसा रोल, फक्त लाटा 1 चपाती अन् फॉलो करा 'ही' ट्रिक

बार्शीत ठाकरे गटाला मोठे यश, भाजपनेही चार जागांवर मारली बाजी|VIDEO

Nagar palika election result LIVE : नाशिकमध्ये मोठा उलटफेर, अजित पवारांनी २५ वर्षांची सत्ता उलथवली, शिंदेंना जोरदार धक्का

SCROLL FOR NEXT