T20 World Cup Semifinal Saam Digital
Sports

T20 World Cup Semifinal: भारत-इंग्लंड सेमिफायनलआधी टेन्शन वाढवणारी भविष्यवाणी; पण कुणाचं?

Paul Collingwood : भारत आणि इंग्लडच्या उपात्या सामन्याआधी इंग्लडचा माजी कर्णधार पॉल कॉलिंगवूडने भारत सामना पराभूत होण्याची शक्यता नाही. इंग्लडला विलक्षण कामगिरी करावी लागले असं म्हटलं आहे.

Sandeep Gawade

टी-२० विश्वचषकातील उपांत्य समाना भारत आणि इंग्लंड यांच्यात २७ जून रोजी खेळला जाणार आहे. त्याआधी इंग्लंडचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू पॉल कॉलिंगवूडने भारतीय संघासंदर्भात केलेलं भाकीत चर्चेत आहे. रोहित शर्माच्या नेतृ्त्वात भारतीय संघ उपांत्य फेरीत पराभूत होण्याची कोणतीही शक्यता नाही. इंग्लंडच्या संघाला विजयासाठी असाधारण कामगिरी करावी लागले, असं भाकीत केलं आहे. २०२२ मध्ये बटलरच्या नेतृ्त्वात इंग्लच्या संघाने १० गडी राखून अंतिम सामना जिंकला होता.

‘स्टार स्पोर्ट्स प्रेस रूम’ कार्यक्रमात पॉल कोलिंगवूड म्हणाला की, भारत आणि इंग्लडमध्ये होणाऱ्या सामन्याबाबत खरं सांगायचं झालं तर भारत यावेळी मजबूत स्थितीत असून हारण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही. भारताला पराभूत करण्यासाठी इंग्लंडला यावेळी विलक्षण कामगिरी करावी लागेलं.

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह जबरदस्त फॉर्मात आहे. माजी चॅम्पियन ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानसारख्या संघांना त्यांच्या गोलदांजीवर धावा करताना संघर्ष करावा लागला. या वेगवान गोलंदाजाची चार षटके खेळाची दिशा ठरवतील, असा विश्वास कॉलिंगवूडने व्यक्त केला आहे. जसप्रीत बुमराच्या सध्याच्या फॉर्मसह भारत मजबूत स्थिती आहे. बुमराह तंदुरुस्त, अचूक, वेगवान आणि अत्यंत कार्यक्षम आहे. कोणत्याही संघाकडे त्याला त्याच्या गोलंदाजीचा सामना करण्याचं कौशल्य नाही.120 चेंडूंच्या सामन्यात बुमराहसारख्या गोलंदाजाचे 24 चेंडू खूप काही करू शकतात. अमेरिकेतली कठीण परिस्थिती आणि कठीण खेळपट्ट्यांवरही भारत आत्मविश्वासाने खेळताना दिसत आहे. रोहित शर्मा पुन्हा फॉर्ममध्ये आला असून ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने शानदार खेळी केली.

गयानाच्या खेळपट्टीने नेहमी गोलंदाजांना साथ दिली आहे. सामना जसजसा पुढे जाईल तसतसा खेळपट्टीचा वेग मदावत जातो. या मैदानावर कायमचं फिरकीपटूंचं वर्चस्व राहिलं आहे मात्र पण चालू विश्वचषक स्पर्धेत संघांनी 170 ते 180 धावांपर्यंत मजल मारली आहे. हा सामना खूपच रंगतदार होईल. दोन्ही संघ अतिशय आक्रमक पध्दतीचा अवलंब करतील. गयानाची खेळपट्टी महत्त्वाची असेल. सपाट खेळपट्ट्यांवर प्रतिस्पर्धी संघांला पराभूत करण्याची क्षमता इंग्लंडकडे आहे, मात्र संथ आणि टर्निंग खेळपट्टी भारताच्या बाजूने असेल, असंही कॉलिंगवूडने म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Onion Chutney Recipe : फक्त ५ मिनिटांत बनवा कांद्याची चटकदार चटणी, सिंपल रेसिपी आताच वाचा

Adult Star Passes Away: एडल्ट स्टार काइली पेजचे वयाच्या २८ व्या वर्षी निधन; ड्रगमुळे मृत्यू झाल्याचा संशय

Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशीसाठी श्री विठ्ठल-रुक्मिणीला मुख्यमंत्र्यांकडून खास पोशाख | VIDEO

Bhandara News : नवं घर बांधल्याचा आनंद गगनात मावेना! रोज नव्या घरी झोपायला जायचे, एका रात्री आक्रित घडलं अन्...

Maharashtra Live News Update: अहिल्यानगरातील महात्मा फुले चौकात भीषण अपघात

SCROLL FOR NEXT