South Africa captain Aiden Markram celebrates after guiding his team to a dominant win against West Indies at Narendra Modi Stadium, Ahmedabad. saamtv
Sports

T20 World Cup: दक्षिण आफ्रिकेचा दणदणीत विजय; Points Table मधील उलटफेरानंतर टीम इंडिया सेमीफायनलमध्ये कशी पोहोचणार?

T20 world Cup : सुपर ८ मध्ये दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा पराभव केला आहे. याविजयासह आफ्रिकेचा संघ उपांत्य फेरीच्या जवळ पोहोचला आहे. एडेन मार्कम हा दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा नायक ठरला. आफ्रिकेच्या विजयामुळे टीम इंडियाचा सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचा मार्गही मोकळा केला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या विजयासह, भारताचे भवितव्य आता त्यांच्या हातात आहे.

Bharat Jadhav

दक्षिण आफ्रिकेचा वेस्ट इंडिजवर ९ विकेट्सने दणदणीत विजय.

एडेन मार्कमच्या स्फोटक खेळीने सामना एकतर्फी.

पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर.

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सामन्यात भारतीय प्रेक्षकांना जे अपेक्षित होतं ते घडलं. दक्षिण आफ्रिकेने सुपर ८ च्या सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव केला. अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ९ विकेट्स राखत मोठा विजय मिळवला. यात कर्णधार एडेन मार्कमच्या स्फोटक खेळीने दक्षिण आफ्रिकेचा मोठा विजय मिळवला.

दक्षिण आफ्रिकेचा संघ वेस्ट इंडिजला हरवून उपांत्य फेरी जवळ पोहचला आहे. शिवाय भारतीय संघावर उपकारही केलेत. दक्षिण आफ्रिकेच्या विजयामुळे आता भारताची उपांत्य फेरी गाठण्याची शक्यता वाढली आहे. वेस्ट इंडिजच्या संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी १७७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. ज्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने २३ चेंडू शिल्लक असताना हे लक्ष्य गाठले. दक्षिण आफ्रिकेने १६.१ षटकांत सामना जिंकला आणि उपांत्य फेरीतील स्थानासाठीचा त्यांचा दावा आणखी मजबूत केला.

दरम्यान, नऊ विकेट्सने झालेल्या पराभवानंतर वेस्ट इंडिजचा रन रेट ५.३५ वरून १.७९१ पर्यंत घसरला. वेस्ट इंडिजवर नऊ विकेट्सने विजय मिळवून, दक्षिण आफ्रिका आता सुपर ८ च्या ग्रुप ए मध्ये पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. आफ्रिकेच्या विजायामुळे भारताचा उपांत्य फेरीत पोहोचण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. दरम्यान गट १ मधील उपांत्य फेरीचे चित्र अद्याप अस्पष्ट आहे. गट २ मधून इंग्लंडने आधीच उपांत्य फेरी गाठलीय.

सेमी फायनलचं अनोखं समीकरण

आज (२६ फेब्रुवारी) चेन्नईमध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाचे समीकरण असे होते की दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिज संघाला हरवावे आणि तेच घडले. आता भारतीय संघाला झिम्बाब्वेला हरवून अखेरच्या सामन्यात वेस्ट इंडिजला हरवावे लागेल. वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेविरुद्ध विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाचे ४ गुण होतील, अशा परिस्थितीत नेट रन रेटला काही अर्थ राहणार नाही. उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी भारताला झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवावा लागेल.

गट १ मध्ये सध्याची परिस्थिती काय आहे?

गट १ मध्ये भारत, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे यांचा समावेश आहे. वेस्ट इंडिज आता एका विजयासह आणि एका पराभवासह दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि झिम्बाब्वे चौथ्या क्रमांकावर आहे.

दक्षिण आफ्रिका (दक्षिण आफ्रिका) – २ सामने, २ विजय, ४ गुण, एनआरआर +२.८९०

वेस्ट इंडिज (विंडीज) – २ सामने, १ विजय, २ गुण, एनआरआर +१.७९१

- भारत (भारत) – १ सामना, ० विजय, ० गुण, एनआरआर -३.८००

- झिम्बाब्वे (झिम्बाब्वे) – १ सामना, ० विजय, ० गुण, एनआरआर -५.३५०

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Accident : पुण्यात मध्यरात्री भीषण अपघात, दारूच्या नशेत तरूणाला चिरडले, जागेवरच मृत्यू

Singer Police Case: प्रसिद्ध गायक कॉलेज कार्यक्रमात नको ते बरळला; आक्षेपार्ह वक्तव्यामुळे गुन्हा, नेमकं झालं काय?

Maharashtra News Live Update: भोंदू अशोक खरात प्रकरणात थोड्याच वेळात सुनावणी

EPFO Rules: नोकरी गेली तरी PF वर व्याज मिळते? वाचा नियम काय सांगतो

MI vs RCB: व्हिलन कोण? मुंबईने गमावला सलग तिसरा सामना; जाणून घ्या पराभवाची ५ प्रमुख कारणं

SCROLL FOR NEXT