Mohammad Shami, Team India  SAAM TV
Sports

T20 विश्वचषकाआधी टीम इंडियाला मोठा धक्का! 'हा' दिग्गज गोलंदाज राहणार संघाबाहेर

ऑस्ट्रेलिया मालिकेच्या दोन दिवस आधी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया मालिकेच्या दोन दिवस आधी टीम इंडियाला (Team India) मोठा झटका बसला आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी टीम मध्ये नसणार आहे. शमीला कोरोनाची लागण झाली आहे. २० सप्टेंबर रोजी मोहालीमध्ये टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला टी-20 सामना खेळणार आहे. या सामन्यापूर्वी सर्वांच्या नजरा शमीवर होत्या. शमी बर्‍याच दिवसांनी संघात परतणार होता, पण आता कोविड-19 मुळे शमी अडचणीत आला आहे. शमीने गेल्या वर्षी टी-20 विश्वचषकात शेवटचा सामना खेळला होता आणि खराब कामगिरीमुळे त्याला संघातून आपले स्थान गमवावे लागले होते.

आयपीएल २०२२ मधील जोरदार कामगिरीच्या जोरावर शमी पुन्हा एकदा टीम इंडियात प्रवेश केला आहे. यानंतर आशिया चषक २०२२ मध्ये भारतीय गोलंदाजांच्या खराब कामगिरी दिसली.

मोहालीत होणाऱ्या टी-20 साठी शमी संघात दिसला नाही. बीसीसीआयनेही (BCCI) शमीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळल्याची माहिती दिली. कोरोनामुळे शमी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियासोबत नसेल. त्याच्या जागी आता उमेश यादवला संघात स्थान देण्यात आले आहे. उमेश यादवही जवळपास दोन वर्षांनी संघात पुनरागमन करणार आहे, अशी माहिती बीसीसीआयने दिली.

भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजित पवारांची तोफ धडाडली, महाराष्ट्र पिंजून काढला

Raigad Politics: राष्ट्रवादी-शिवसेना संघर्ष टोकाला; मंत्री भरत गोगावले यांच्या मुलावर गुन्हा दाखल

IND vs SA ODI: डोंगराएवढी धावसंख्या करूनही टीम इंडियाचा दारूण पराभव; दक्षिण आफ्रिकेची मालिकेत १-१ ने बरोबरी

आजारपणामुळे ब्रेक घेतलेल्या संजय राऊतांची भेट! कोणकोणत्या राजकीय नेत्यांकडून विचारपूस?

Maharashtra Politics: कोकणात ठाकरेंची स्पेस 'झिरो'? राणे बंधूंचीच चर्चा, ठाकरे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT