T-20 World Cup saam tv
Sports

T-20 World Cup: भारताच्या पराभवामुळे पाकिस्तानची चिंता वाढली; T20 WC सेमीफायनलच गणित झालं अवघड

भारताच्या (Team India) पराभवामुळे पाकिस्तानचा सेमीफायनल गाठण्यासाठी प्रवास अधिक अवघड झाला आहे.

Vishal Gangurde

T-20 World Cup : ऑस्ट्रेलियात टी20 वर्ल्डकप 2022 मध्ये आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पर्थच्या मैदानात महामुकाबला रंगला. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीनं भारतीय फलंदाजांना स्वस्तात माघारी पाठवलं. त्यामुळे भारतानं आफ्रिकेला 134 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र, आफ्रिकेच्या फलंदाजांनी चौफेर फटेकबाजी करत भारताचा पराभव केला. भारताच्या (Team India) पराभवामुळे पाकिस्तानचा सेमीफायनल गाठण्यासाठी प्रवास अधिक अवघड झाला आहे.

टी20 वर्ल्डकप 2022 मध्ये पाकिस्तान संघ सलग दोन सामने पराभूत झाला आहे. नेदरलँड्सविरुद्धचा सामना पाकिस्तानने जिंकला. उपांत्य फेरी गाठण्यासाठी पाकिस्तानला इतरांवर अवलंबून रहावे लागणार आहे. पाकिस्तानला त्यांचे सर्व सामने जिंकावे लागणार आहे. पाकिस्तान संघ हा भारतीय संघाच्या विजयावर देखील अवलंबून होता. मात्र, भारतीय संघ पराभूत झाल्यामुळे पाकिस्तानला सेमीफायनलला जाण्याचा मार्ग खूप अवघड झाला आहे.

पाकिस्तानने रविवारी नेदरलँड्सविरुद्धचा सामना जिंकून खाते उघडले. पाकिस्तान संघ उरलेले तीन सामने जिंकून टेबलमध्ये जास्तीत जास्त ६ गुण मिळवू शकतो. २ सामन्यात तीन गुण मिळविलेल्या दक्षिण अफ्रिकेचा पराभव करण्याची गरज भारताला होती. दक्षिण आफ्रिका भारताकडून पराभूत झाला असता आणि त्यानंतर पुढच्या सामन्या पाकिस्तानकडून दक्षिण आफ्रिका पराभूत झाला असता. त्यामुळे पाकिस्तान संघ जास्तीत जास्त ५ गुणापर्यंत पोहोचू शकला असता. त्यामुळे पाकिस्तान या गणिताच्या माध्यमातून सेमीफायनला जाण्याची संधी मिळाली असती.

दरम्यान, दक्षिण आफ्रिका संघ टी20 वर्ल्डकप 2022 मध्ये अद्याप स्पर्धेत अपराजित आहेत. या स्पर्धेत भारताला शेवटचे दोन सामने जिंकण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे त्यांचे ८ गुण होतील. तर नेदरलँड्स वगळता पाकिस्तानने त्यांच्या पुढच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले, तरीही इतरांच्या पुढे जाण्याचा मार्ग सुकर होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

सप्तशृंगी गडावरून परतताना भीषण अपघात; दुचाकीला प्रवासी वाहनाची जोरदार धडक, तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT