IND Vs SA T20 World Cup 2022 LIVE : मार्क्रमची आक्रमक खेळी, किलर मिलरच्या नाबाद अर्धशतकामुळं भारताचा पराभव

पर्थच्या मैदानात भारत-आफ्रिका आमने-सामने, सेमीफायनलमध्ये कोण जाणार ?
India vs South Africa live match, T20 World Cup 2022
India vs South Africa live match, T20 World Cup 2022saam Tv

मार्क्रम -मिलरची तुफान फटकेबाजी, आफ्रिकेचा भारताविरुद्ध विजय

ऑस्ट्रेलियात टी20 वर्ल्डकप 2022 चा थरार सुरु असून आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पर्थच्या मैदानात महामुकाबला रंगला. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीनं भारतीय फलंदाजांना स्वस्तात माघारी पाठवलं. लुंगीन चार षटकात 29 धावा देऊन चार विकेट्स घेतल्या. कमालिचा फॉर्मात असलेल्या सूर्यकुमार यादवने वर्ल्डकपमध्ये सलग दुसर अर्धशतक ठोकलं. सूर्यकुमारच्या आक्रमक खेळीमुळं भारतानं आफ्रिकेला 134 धावांचं आव्हान दिलं होतं.

त्यानंतर या धावांचं आव्हान पेलण्यासाठी उतरलेल्या आफ्रिकेच्या फलंदाजांची पॉवर प्ले मध्ये पुरती दमछाक झाली. तीन फलंदाज बाद झाल्यानंतर डेव्हिड मिलर आणि एडन मार्क्रमने डाव सावरला. माक्रमच्या अर्धशतकी खेळीमुळं आणि मिलरच्या चौफेर फटकेबाजामुळं भारताचा पराभव झाला. माक्रमने 41 चेंडूत 52 धावा तर डेव्हिड मिलरने 46 चेंडूत नाबाद 59 धावांची खेळी साकारली.

मार्क्रमने ठोकलं अर्धशतक, 19 षटकानंतर आफ्रिका 128-5

भारताचा फिरकीपटू रवीचंद्रन आश्विनच्या गोलंदाजीवर आफ्रिकन फलंदाज माक्रमला जीवदान मिळालं. विराट कोहलीनं झेल सोडल्यामुळं माक्रम मैदानावर तग धरून राहिला. तसंच तेराव्या षटकातंही माक्रम धाबबाद होतो होता वाचला. चौदाव्या षटकानंतर आफ्रिकेची धावसंख्या 85-3 अशी झाली होती. एडन माक्रमने आक्रमक खेळी करत अर्धशतक ठोकलं. परंतु, हार्दिक पंड्यानं टाकलेल्या सोळाव्या षटकात मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात माक्रम 52 धावांवर झेलबाद केला. त्यानंतर अठराव्या षटकात आश्विननं स्टब्सला सहा धावांवर पायचित केलं.

माक्रम-मिलरच डाव सावरतोय, अकरा षटकानंतर आफ्रिका 56-3

भारतानं दिलेलं 134 धावांचं आव्हान पेलण्यासाठी मैदानात उतरलेल्या आफ्रिकन फलंदाजांची पुरती दमछाक झाली आहे. अर्शदीपनं एकाच षटकात आफ्रिकेला दोन धक्के दिलं. अर्शदीपच्या गोलंदाजीवर क्विंटन डिकॉक आणि रिली रोसो बाद झाला. त्यानंतर मोहम्मद शमीनं कर्णधार टेम्बा बवूमाला दहा धावांवर झेलबाद केलं. त्यामुळं पॉवर प्ले मध्ये आफ्रिकेची धावसंख्या मंदावली. सात षटकानंतर आफ्रिकेची धावसंख्या 32-3 अशी होती. त्यानंतर आठव्या आणि नवव्या षटकात आफ्रिकेला धावांचा सूर गवसला नाही. त्यामुळं नऊ षटकानंतर आफ्रिकेची धावसंख्या 35-3 अशी होती. परंतु, दहाव्या आणि अकराव्या षटकात डेव्हिड मिलर आणि माक्रमने धावसंख्येचा वेग वाढवला.

अर्शदीपनं आफ्रिकेला दिला दुसरा धक्का, पाच षटकानंतर आफ्रिका 21-2

भारतानं दक्षिण आफ्रिकेला 134 धावांचं आव्हान दिलं आहे. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आफ्रिकेचे सलामीवीर फंलंदाज क्विंटन डिकॉक आणि टेम्बा बवूमा मैदानाक उरतले आहेत. भारताचा वेगवान गोलंदाज भूवनेश्वर कुमारने पहिल्या षटकात आफ्रिकन फलंदाजांना आक्रमक फटके मारू दिले नाहीत. त्यानंतर अर्शदीप सिंगने दुसऱ्या षटकात क्विंटन डिकॉकला पहिल्याच चेंडूवर स्लिपमध्ये झेलबाद केलं. त्यानंतर अर्षदीपनं सटीक गोलंदाजी करून रिली रोसोला शून्यावर पायचित केलं.

भारताचं आफ्रिकेला 134 धावांचं टार्गेट, सूर्या पुन्हा तळपला

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील थरारक सामना पर्थच्या मैदानात सुरू आहे. नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम फंलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीनं भारताच्या स्टार फलंदाजांना वेगवान माऱ्यापुढं गुंडाळलं. रोहित शर्मा, के एल राहुल, हार्दिक पंड्या स्वस्तात माघारी परतला. दिपक हुड्डाला भोपळाही फोडता आला नाही. तो शून्यावर बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि कार्तिकनं डाव सावरला. पण कार्तिकही मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. त्यानंतर भारताचा कमालीचा फॉर्मात असलेला सूर्यकुमार यादवने चौफेर फटकेबाजी करून 40 चेंडूत 68 धावा कुटल्या. भारतासाठी एकमेव फलंदाज सूर्यकुमार यादवने मोठी धावसंख्या साकारली. त्यामुळे भारतानं वीस षटकांत 9 विकेट्स गमावून 133 धावा केल्या.

भारताचे सलामीवीर फंलदाज के एल राहुल आणि कर्णधार रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर विराट कोहली आणि दिपक हुड्डालाही धावांचा सूर गवसला नाही. लुंगी एनगिडीच्या वेगवान माऱ्यापुढं भारताचे शेर ढेर झाले. त्यानंतर मैदानात उतरलेला भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्यावर मोठी जबाबदारी होती. परंतु, पंड्यालाही लुंगीच्या उसळत्या चेंडूनं पव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि कार्तिकने सावध खेळी करत भारताचा स्कोरबोर्ड चालवला. सूर्यकुमारने चौफेर फटकेबाजी करून टी20 वर्ल्डकपमध्ये सलग दुसरं अर्धशतक ठोकलं. त्यानंतर सोळाव्या षटकात कार्तिक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला.

हार्दिक पंड्या बाद, चौदाव्या षटकानंतर भारताची धावसंख्या 89-5

पॉवर प्ले मध्ये भारताच्या धावसंख्येची गती मंदावली. विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव भारताची कमान सांभाळत होते. परंतु, लुंगी एनगिडीनं सातव्या षटकातंही भेदक गोलंदाजी करून विराट कोहलीला 12 धावांवर झेलबाद केलं. त्यानंतर आठव्या षटकात आफ्रिकेचा गोलंदाज एनरिच नोर्टजेनं दिपक हुड्डाला बाद केलं. हुड्डाला भोपळाही फोडता आला नाही. तो शून्यावर बाद झाला. त्यानंतर हार्दिक पंड्यालाही धावांचा सूर गवसला नाही. पंड्या एनगिडीच्या गोलंदाजीवर अवघ्या दोन धावांवर झेलबाद झाला. सूर्यकुमार यादव आणि कार्तिक भारताची कमान सांभाळत आहेत. सूर्यकुमार यादव आक्रमक फंलदाजी करत असून भारताची धावंसंख्या वाढवताना दिसत आहे.

पॉवर प्ले संपला, आठ षटकानंतर भारताची धावसंख्या 47-4

पंधराव्या षटकात लुंगी एनगिडीनं कर्णधार रोहित शर्माला मोठा फटका मारण्यास मजबूर केलं. षटकरा मारण्याच्या उद्देशानं रोहितनं 15 धावांवर विकेट दिली. त्यानंतर एनगिडीनं राहुलला स्लिपमध्ये विकेट टाकण्यास मजबूर केलं. राहुल 9 धावा करून पुन्हा एकदा स्वस्तात पव्हेलियनमध्ये परतला. त्यामुळं पॉवर प्ले मध्ये भारताच्या धावसंख्येची गती मंदावली. विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव भारताची कमान सांभाळत होते. परंतु, लुंगी एनगिडीनं सातव्या षटकातंही भेदक गोलंदाजी करून विराट कोहलीला 12 धावांवर झेलबाद केलं. त्यानंतर आठव्या षटकात आफ्रिकेचा गोलंदाज एनरिच नोर्टजेनं दिपक हुड्डाला बाद केलं. हुड्डाला भोपळाही फोडता आला नाही. तो शून्यावर बाद झाला.

भारताचे सलामीवीर पव्हेलियनमध्ये, राहुल-रोहित तंबूत, भारत 33-2

दक्षिण आफ्रिकेसाठी दुसरं षटक वेगवान गोलंदाज कगिसो रबाडानं टाकलं. रबाडाने सुरुवातीचे चेंडू अचूक टप्प्यावर टाकले. परंतु चौथ्या उसळत्या चेंडूवर रोहित शर्माने जोरदार पुल शॉट मारून षटकार ठोकला. त्यामुळं भारताच्या धावफलकावर सहा धावांची मोहोर उमटली. तिसऱ्या षटकान पार्नेलला राहुलनं मिड विकेटच्या दिशेनं षटकार मारला. चौथ्या षटकात रबाडाच्या गोलंदाजीवरही भारतीय फलंदाजांना मोठे फटके मारता आले नाहीत. दरम्यान पंधराव्या षटकात लुंगी एनगिडीनं कर्णधार रोहित शर्माला मोठा फटका मारण्यास मजबूर केलं. षटकरा मारण्याच्या उद्देशानं रोहितनं 15 धावांवर विकेट दिली. त्यानंतर एनगिडीनं राहुललाही स्लिपमध्ये विकेट टाकण्यास मजबूर केलं. राहुल 9 धावा करून पुन्हा एकदा स्वस्तात पव्हेलियनमध्ये परतला.

राहुल-रोहित मैदानात, पहिल्या षटकात भारताचं खातंही उघडलं नाही

भारताचे सलामीवीर के एल राहुल आणि कर्णधार रोहित शर्मा फलंदाजीसाठी पर्थच्या मैदानात उतरले आहेत. पहिल्या षटकाची सुरुवात आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज वेनी पार्नेलनं केली. पार्नेलनं अचूक टप्प्यावर गोलंदाजी करून राहुलला धावांचा सूर गवसून दिला नाही. त्यामुळे पहिल्या षटकानंतर भारताची धावसंख्या 0-0 अशी आहे.

रोहितनं नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

ऑस्ट्रेलियात टी20 वर्ल्डकप 2022 चा थरार सुरु असून आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पर्थच्या मैदानात महामुकाबला रंगणार आहे. भारताने दोन सामने जिंकून चार गुण प्राप्त करून अव्वल स्थान गाठलं आहे. तर दक्षिण आफ्रिका तीन गुण मिळवून तिसऱ्या स्थानावर आहे. सुपर 12 च्या ग्रुप 2 मधील हे दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांविरोधात लढणार आहेत. विशेष म्हणजे पाकिस्तानचा संघ आज भारताच्या विजयासाठी प्रार्थना करणार आहे. कारण पाकिस्तानला सेमिफायनलमध्ये प्रेवश करायचं असेल तर आज भारतानं सामना जिंकणं त्यांच्यासाठी अनिवार्य आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com