Team India players react during a tense moment as Super 8 qualification hangs on net run rate in T20 World Cup 2026. saamtv
Sports

T20 World Cup 2026: टीम इंडिया सुपर ८ मधून बाहेर होणार? रन रेटनं वाढवलं टेन्शन

T20 World Cup 2026 Points Table: टीम इंडियावर सुपर ८ मधून बाहेर पडण्याचा धोका कायम आहे. झिम्बाब्वेविरुद्ध वेस्ट इंडिजच्या जबरदस्त कामगिरीनंतर ही परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.

Bharat Jadhav

झिम्बाब्वेला हरवल्यानंतर वेस्ट इंडिजच्या रन रेटमध्ये मोठी वाढ झाली आहे. वेस्ट इंडिज संघ गट अ च्या पॉइंट्स टेबलच्या अव्वल स्थानावर पोहोचलाय. त्यांच्या रन रेट आणि दक्षिण आफ्रिकेच्या रन रेटमध्ये लक्षणीय तफावत निर्माण झाली आहे. दक्षिण आफ्रिका पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. पॉइंट्स टेबलवरील ही स्थिती टीम इंडियाचं टेन्शन वाढवणारी आहे. या स्थितीमुळे भारतीय संघ सुपर-८ मधून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर पोहोचलाय.

कॅरेबियन संघ रन रेटमुळे पॉइंट्स टेबलमध्ये कुठे पोहोचला आहे, हे जाणून घेऊ. झिम्बाब्वेला पराभूत केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेला मागे टाकत ग्रुप अ च्या पॉइंट्स टेबलमध्ये वेस्ट इंडिजनं अव्वल स्थान मिळवले आहे. गुणतालिकेत वेस्ट इंडिजचा रन रेट आता ५.३५ आहे. वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघाला प्रत्येकी २ गुण आहेत. त्यांच्या रन रेटमध्ये लक्षणीय फरक पडला आहे. दक्षिण आफ्रिकेचा रन रेट फक्त ३.८ आहे.

पॉइंट्स टेबलमध्ये टीम इंडियाची खराब कामगिरी

झिम्बाब्वेवर वेस्ट इंडिजच्या विजयामुळे टीम इंडियाला एक फायदा झाला आहे, तो म्हणजे टी२० विश्वचषक २०२६ तील सुपर ८ च्या ग्रुप ए मधील पॉइंट्स टेबलमध्ये ते तळाला गेले नाहीत. पण सुपर ८ मधून बाहेर पडण्याचा धोका अजूनही कायम आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सुपर ८ सामन्यात पराभव झाल्यानंतर भारताचा रन रेट उणे -३.८ झाला आहे.

टीम इंडियाला सुपर ८ मधून बाहेर पडण्याचा धोका कसा?

अनेकांना प्रश्न असेल जर पॉइंट्स टेबलमध्ये टीम इंडिया तळाशी नाही तर सुपर ८ मधून बाहेर जाण्याचा धोका कसा? त्याचं असं की, वेस्ट इंडिजच्या शानदार विजयानंतर भारताला त्यांचे पुढील दोन्ही सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकावे लागतील. हे सामने २६ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी होणार आहेत. त्यातील वेस्ट इंडिजशी होणारा सामना १ मार्चला असेल आणि २६ फेब्रुवारीला टीम इंडियाची लढत झिम्बाब्वेशी असणार आहे.

या दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवण्यासोबतच टीम इंडियाला २६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा सामन्यावर अवलंबून राहावे लागेल. हा सामना दक्षिण आफ्रिकेनं जिंकला तर भारतीय संघाच्या आशा पल्लवित होतील. नाहीतर नेट रन रेटमुळे टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये पोहोचणे अशक्य होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Railways: TTE आणि TC यांच्यातील फरक तुम्हाला माहितीये का?

Maharashtra News Live Update: सलग पाच दिवसांच्या अतिवृष्टीचा नालासोपाऱ्यात तिसरा बळी; पाण्यात पोहताना १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमधील शिवसेनेच्या बड्या नेत्यावर गुन्हा, नेमकं प्रकरण काय?

पावसात भिजल्यानंतर प्या गरमा गरम ब्रोकोली सूप, हुडहुडी होईल दूर

ITR Filing 2026-27: ITR भरताना कर्ज, वारसा हक्कातून मिळालेले पैसे दाखवावे लागतील का? नवीन नियम सोप्या भाषेत समजून घ्या

SCROLL FOR NEXT