Gautam Gambhir addresses the media after India’s win, praising Sanju Samson’s match-winning performance. saam tv
Sports

IND vs WI: संजू सॅमसन आतापर्यंत प्लेइंग ११ मध्ये का नव्हता? शानदार खेळीचं काय आहे सीक्रेट? गौतम गंभीरनं केला धक्कादायक खुलासा

Gautam Gambhir Reveals Secret Sanju Samson: वेस्ट इंडिजविरुद्ध संजू सॅमसनने खेळलेल्या खेळी पाहून टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक खूप आनंदी झालाय. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत त्याने संजूच्या शानदार खेळीचे रहस्य सर्वांसमोर उघड केले आहे.

Bharat Jadhav

  • संजू सॅमसनच्या दमदार खेळीमुळे भारताला महत्त्वाचा विजय मिळाला.

  • गौतम गंभीर यांनी पत्रकार परिषदेत सॅमसनच्या निवडीमागील कारण स्पष्ट केले.

  • प्लेइंग 11 मधील बदल हा संघाच्या रणनीतीचा भाग असल्याचे सांगितले.

टीम इंडियाने उल्लेखनीय कामगिरी करत २०२६ च्या टी-२० वर्ल्ड कपच्या सेमी फायनलचं तिकीट मिळवलंय. या ऐतिहासिक विजयाचा खरा हिरो संजू सॅमसन ठरला. त्याने १९८ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना ९७ धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या शानदार खेळीमुळे टीम इंडियाने ५ विकेट राखत वेस्ट इंडिजला पराभूत केलं.

संजू स्पर्धेच्या सुरुवातीला डावाची सुरुवात करण्यासाठी तो सलामीचा फलंदाज म्हणून पहिला पर्याय नव्हता, परंतु महत्त्वाच्या सामन्यांमध्ये तो सलामीसाठी आला आणि त्याने अखेरपर्यत मैदानात राहत ऐतिहासिक विजय मिळवला.

संजूच्या शानदार खेळीचे रहस्य काय?

टीम इंडियाच्या विजयानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आनंदी झाला आहे. "संजू सॅमसनने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तीन शतके झळकावली आहेत. आम्हाला त्याची प्रतिभा नेहमीच माहित होती.

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत त्याने चांगली कामगिरी केली नव्हती. म्हणून त्याला विश्रांती घेणे महत्वाचे होते, परंतु आम्हाला माहित होते की जेव्हा जेव्हा त्याची गरज असेल तेव्हा तो येईल आणि कामगिरी करेल. संजू हा एक जागतिक दर्जाचा खेळाडू आहे. जेव्हा संघाला त्याची सर्वात जास्त गरज होती तेव्हा तो भक्कमपणे उभा राहिला."

संजू सॅंमसनचा खराब फॉर्म

या स्पर्धेपूर्वी टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली. या मालिकेत संजू सॅमसनकडून चांगल्या धावा करता आल्या नाहीत. त्याने पाच सामन्यांमध्ये फक्त ४६ धावा केल्या होत्या. यामुळे संजूला टी२० वर्ल्ड कपच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये विश्रांती देण्यात आली होती.

दरम्यान अभिषेक आजारी पडल्यानंतर त्याला अमेरिकेविरुद्ध संधी मिळाली. त्यानंतर त्याला नामिबिया आणि नंतर झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यांमध्ये मैदानात उतरवण्यात आले. या विश्वचषकातील त्याचा तिसरा सामना होता. या सामन्यात संजूने नाबाद ९७ धावा केल्या. त्याने आता तीन डावांमध्ये १४३ धावा केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: होळीच्या दिवशी रक्तरंजित थरार, कुऱ्हाडीने ६ जणांवर सपासप वार; ३ महिलांसह एकाचा जागीच मृत्यू

EPFO Update: होळीला ३१ कोटी कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; PF खात्यावरील व्याजदर वाढणार की कमी होणार? आज होणार निर्णय

Animal glowing eyes: रात्रीच्या अंधारात प्राण्यांचे डोळे का चमकतात? जाणून घ्या वैज्ञानिक कारण

Sanju Samson Networth: मॅच विनर संजू सॅमसन किती कोटींचा मालक, त्याची एकूण संपत्ती किती?

Maharashtra Live News Update : नागपुरातील एसबीएल कंपनीतील स्फोट प्रकरणी नऊ जणांना अटक

SCROLL FOR NEXT