IND vs NZ Final saam tv
Sports

IND vs NZ Final: वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकण सोपं नाही...! टीम इंडियासमोर 3 मोठी आव्हानं!, सूर्या सेना बदलणार इतिहास?

Three Big Challenges for Team India: टी20 वर्ल्डकप 2026 चा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अहमदाबादमध्ये खेळवला जाणार आहे. या मोठ्या सामन्यापूर्वी टीम इंडियासमोर तीन मोठी आव्हाने उभी आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

प्रत्येकजण वाट पाहत असलेला दिवस अखेर आज आला आहे. आज म्हणजेच ८ मार्च रोजी महामुकाबला रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये टी-२० वर्ल्डकपचा फायनल सामना रंगणार आहे. १९ वर्षांनंतर आता पुन्हा एकदा दोन्ही टीम फायनलमध्ये आमने सामने येणार आहेत.

टीम इंडिया तिसऱ्यांदा हा खिताब जिंकण्याच्या तयारीत आहेत. तर किवी टीमने आतापर्यंत एकदाही वर्ल्डकपची ट्रॉफी उचललेली नाही. त्यामुळे यंदा न्यूझीलंड वर्ल्डकप जिंकणार याकडे त्यांचं लक्ष आहे. दरम्यान टीम इंडियाला हा वर्ल्डकप जिंकायचा असेल तर भारतासमोर ३ आव्हान उभी आहेत. ही आव्हानं काय आहेत ते पाहूयात.

पहिलं आव्हान- अहमदाबादमध्ये आयसीसी फायनल जिंकणं

अहमदाबादचे मैदान टीम इंडियासाठी फारचं चांगलं राहिलेलं नाही. भारताने याठिकाणी एकही आयसीसी फायनल जिंकलेली नाही. त्यांनी शेवटचा सामना २०२३ च्या वनडे वर्ल्डकपचा अंतिम सामना खेळला होता. या सामन्यात आपल्याला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्विकारावा लागला होता.

गेल्या सहा वर्षांत २०२३ च्या वर्ल्डकपपासून भारताने चार वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये एकूण ३२ सामने खेळले आहेत. यामध्ये दोनदा पराभव पत्करावा लागला आहे. हे दोन्ही पराभव मोठ्या सामन्यांमध्ये झाले आहेत. पहिला २०२३ चा अंतिम सामना होता, तर दुसरा पराभव त्याच वर्ल्डकपमध्य सुपर ८ सामन्यात झाला होता. ज्यामध्ये आफ्रिकेने आपल्याला ७६ रन्सने पराभूत केलंय.

दुसरं आव्हान- न्यूझीलंडविरूद्ध पराभवाची मालिका संपवणं

टीम इंडियासमोर दुसरं आव्हान न्यूझीलंडचं आहे. टी-२० वर्ल्डकपमध्ये इतिहासात भारत आणि न्यूझीलंड तीन वेळा आमनेसामने आले आहेत. मुख्य म्हणजे तिन्ही वेळा वेळा किवींनी विजय मिळवला आहे. प्रथम त्यांनी २००७ मध्ये भारताला १० रन्सने तर २०१६ मध्ये ४७ रन्सने पराभूत केलं. त्यानंतर २०२१ मध्ये त्यांनी ८ विकेट्सने विजय मिळवला. या स्पर्धेत टीम इंडियाने जेव्हा जेव्हा किवी टीमचा सामना केला आहे तेव्हा आपल्याला पराभव पत्करावा लागला आहे.

तिसरं आव्हान- रविवारचा इतिहास बदलायचाय

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियासमोर रविवारचा इतिहास बदलण्याचं आव्हान आहे. इतिहास तुम्ही पाहिलं तर, टीम इंडियाने रविवारी खेळलेल्या सर्व मर्यादित ओव्हर्सच्या स्पर्धांमध्ये नॉकआउट आणि फायनलमध्ये फक्त एकाच सामन्यात विजयात विजय मिळवला आहे.

भारताने २००० चा वर्ल्डकप, २००३ चा वर्ल्डकप, २०१४ चा टी२० वर्ल्डकप आणि २०१७ चा चॅम्पियन्स ट्रॉफी गमावली आहे. हे सामने रविवारच्या दिवशी खेळवण्यात आले होते. १९८३ चा वर्ल्डकप आणि २०११ चा वनडे वर्ल्डकप आणि २०२४ चा टी२० वर्ल्डकप शनिवारी झाला होता आणि भारताने विजेतेपद जिंकलं होतं. २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताचा एकमेव विजय रविवारी झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MS Dhoni आयपीएलच्या किती सामन्यांना मुकणार? का असणार संघाबाहेर?

Bihar Politics: राजकारणातील सर्वात मोठी बातमी! मुख्यमंत्री देणार CM पदाचा राजीनामा

अमेरिकेत ट्रम्पविरोधात 'नो किंग्स' आंदोलन; 90 लाख नागरीक उतरले रस्त्यावर, कारण काय?

'वेलकम टू हेल' इराणचा अमेरिकेला इशारा, इराणची धमकी, जगाला धडकी

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची पुन्हा चर्चा, दादांच्या राष्ट्रवादीकडून विलिनीकरणाची ऑफर

SCROLL FOR NEXT