Rohit Sharma named Men’s T20 World Cup tournament ambassador social media
Sports

Rohit Sharma : टी २० वर्ल्डकपसाठी रोहित शर्माकडं मोठी जबाबदारी, जय शहांची घोषणा

Rohit Sharma named Men’s T20 World Cup tournament ambassador : भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा याच्याकडं आयसीसी पुरुष टी २० वर्ल्डकप २०२६ च्या स्पर्धेसाठी मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. आयसीसीनं त्याची वर्ल्डकप स्पर्धेसाठी ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून निवड केली आहे.

Nandkumar Joshi

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि दोनदा टी २० वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलेल्या रोहित शर्माकडं आयसीसीनं मोठी जबाबदारी दिली आहे. आयसीसी पुरूष टी २० वर्ल्डकप २०२६ (ICC Men's T20 World Cup 2026) स्पर्धेचा ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून रोहित शर्माची निवड करण्यात आली आहे.

टी २० वर्ल्डकप स्पर्धेला ७ फेब्रुवारीपासून सुरुवात होईल. ८ मार्च २०२६ रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना होईल. भारत आणि पाकिस्तान हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी संघ १५ फेब्रुवारी रोजी आमनेसामने येतील. या सामन्याची क्रिकेटप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता असेल.

रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघानं टी २० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा जिंकली होती. टी २० आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत रोहित शर्मानं ४२३१ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याच्या धावांची सरासरी ३२.०१ तर, स्ट्राइक रेट १४० पेक्षा अधिक राहिला आहे. भारतीय संघानं आतापर्यंत दोन टी २० वर्ल्डकप स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यात त्यानं भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. २०२४ च्या वर्ल्डकप स्पर्धेत तो भारताचा कर्णधार होता.

२००७ मध्ये झालेल्या टी २० वर्ल्डकप स्पर्धेत त्यानं पदार्पणातच फलंदाजीची चुणूक दाखवली होती. २०२४ मधील टी २० वर्ल्डकपमध्ये भारताचा कर्णधार म्हणून त्यानं देशाला ११ वर्षांनंतर आयसीसीची ट्रॉफी जिंकून दिली होती. या स्पर्धेत त्यानं २५७ धावा केल्या होत्या. भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही ठरला होता. त्यानं ऑस्ट्रेलियाच्या विरोधात ४१ चेंडूत ९२ धावांची तुफानी खेळी केली होती. तर इंग्लंडविरुद्ध ५७ धावांची खेळी केली होती. वर्ल्डकप विजेतेपद जिंकल्यानंतर रोहित शर्माने टी २० मधून निवृत्ती जाहीर केली होती.

टी २० वर्ल्डकप स्पर्धेचा ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून निवड झाल्यानंतर रोहित शर्माने भावुक प्रतिक्रिया दिली. ही स्पर्धा पुन्हा भारतात खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेसोबत नव्या रुपात जोडलं जाणं माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो. भारताच्या यजमानपदाचा आनंद घेणार असून, माझ्यासाठी हे अविस्मरणीय क्षण असतील, असे तो म्हणाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

Wednesday Horoscope : जोडीदाराबरोबर दिलजमाई करावी लागेल; 5 राशींच्या लोकांना जपून पावले उचलावी लागणार

SCROLL FOR NEXT