T20 World Cup 2024 SA vs AFG: Saamtv
Sports

SA Vs AFG: T20 वर्ल्डकपमधून अफगाणिस्तानचे पॅकअप! द. अफ्रिकेची पहिल्यांदाच फायनलमध्ये एन्ट्री; ९ विकेट्सने उडवला धुव्वा

T20 World Cup 2024 SA vs AFG: विश्वचषकामध्ये अफगाणिस्तान आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात सामना झाला. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने 9 विकेट्सने एकतर्फी विजय मिळवला.

Gangappa Pujari

टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत बलाढ्य संघांना धुळ चारत उपांत्य पूर्व फेरी गाठलेल्या अफगाणिस्तान संघाला सेमिफायनलमध्ये पराभव स्विकारवा लागला. आज दक्षिण- आफ्रिका आणि अफगाणिस्थानमध्ये लढत झाली. या सामन्यात अफगाणिस्तानच्या संघाचा ९ विकेट्सनी दारुण पराभव झाला. या विजयासोबतच दक्षिण आफ्रिका संघाने पहिल्यांदाच टी- ट्वेंटी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात एन्ट्री केली आहे.

टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर आज अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका संघामध्ये अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी लढत झाली. संपूर्ण स्पर्धेत तुफान फॉर्ममध्ये असणाऱ्या अफगाणिस्तान संघाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र दक्षिण आफ्रिकेने पहिल्या चेंडूपासून सामन्यावर पकड मिळवत एकतर्फी विजय मिळवला.

अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला, जो त्यांच्यासाठी पूर्णपणे चुकीचा ठरला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या अफगाणिस्तानचा संघ 11.5 षटकांत केवळ 56 धावांवर सर्वबाद झाला. दक्षिण आफ्रिकेकडून मार्को यानसेन आणि तबरेझ शम्सी यांनी भेदक मारा करत प्रत्येकी ३ बळी घेतले. त्यानंतर 8.5 षटकांत 1 गडी गमावत 60 धावा करून दणदणीत विजय मिळवला अन् दिमाखात फायनलमध्ये प्रवेश केला.

आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन : एडन मारक्रम(कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जान्सेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्खिया आणि तबरेझ शम्सी.

अफगाणिस्तान प्लेइंग ईलेव्हन: राशीद खान (कर्णधार), रहमानउल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, अजमतुल्ला उमरझाई, गुलबदिन नायब, मोहम्मद नबी, करीम जनात, नांगेलिया खरोटे, नूर अहमद, नवीन-उल-हक आणि फजलहक फारुकी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS TRANSFERS: राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती वाचा

ED Raids : माजी आयुक्त अनिलकुमार पवारांच्या घरी ईडीचा छापा; संपत्ती जाणून डोळे पांढरे होतील, वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Live News Update: ठाण्याच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून श्रीमंती अशिमा मित्तल यांची नियुक्ती

Tariff : ट्रम्पचा धक्का, भारताला फटका? कोण-कोणत्या उद्योगांवर होणार परिणाम, जाणून घ्या

Ladki Bahin Yojana : राज्यातील ५० लाख बहिणी अपात्र ठरल्या; काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT