india vs australia google
क्रीडा

T20 World Cup 2024 : रोहित शर्माची वादळी सुरुवात, शिवम दुबे अन् हार्दिक पंड्याचा फिनिशिंग टच! ऑस्ट्रेलियासमोर मोठं आव्हान

Vishal Gangurde

नवी दिल्ली : सुपर 8 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत होत आहे. ऑस्ट्रेलियासाठी हा सामना करा किंवा मरो सारखा आहे. या सामन्यात रोहित शर्माने वादळी सुरुवात केली. तर दुबे आणि पंड्याने फिनिशिंग टच दिला. टीम इंडियाच्या फलंदाजांच्या आक्रमक खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला २०६ धावांचं आव्हान दिलं आहे.

टी२० वर्ल्ड कपच्या सुपर ८ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात हायव्होल्टेज सामना होत आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु हा निर्णय भारतीय कर्णधार रोहित शर्माने चुकीचा ठरवला. सुपर८ च्या सामन्यात रोहित शर्माने दमदार फलंदाजी करत ४१ चेंडूत ९२ धावा केल्या. रोहितने अवघ्या १९ चेंडूत अर्धशतक ठोकलं.

भारतीय संघाने स्फोटक सुरुवात केली. रोहित शर्माने स्टार्कच्या एकाच षटकात २९ धावा ठोकल्या होत्या. यादरम्यान त्याने ४ षटकार मारले. पण या सामन्यात विराट कोहली आजही विशेष काही करू शकला नाही. विराटच्या विकेटनंतर रोहित शर्माने आक्रमक खेळी सुरुवात केली.

तिसऱ्या षटकात ४ षटकार आणि एक चौकार लगावला. रोहितने वेगवान अर्धशतक पूर्ण केलं. रोहितने ऋषभ पंतसोबत दुसऱ्या विकेटसाठी ८७ धावांची भागिदारी रचली. त्यानंतर पंत आठव्या षटकात बाद झाला. पुढे रोहित शर्मा सहज शतक पूर्ण करेल असे वाटत असताना ९२ धावांवर बाद झाला. रोहितचं ८ धावांनी शतक हुकलं.

त्यानंतर उतरलेल्या सूर्यकुमार यादवसोबत रोहित शर्माने तिसऱ्या विकेटसाठी ३४ धावा कुटल्या. सूर्याने १६ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकार लगावले. स्टार्कने १५ व्या जाळ्यात फसवलं. चौथ्या विकेटसाठी सूर्या आणि शिवम दुबेने ३२ धावांची भागिदारी रचली. तर शिवमने २२ चेंडूत २८ धावा केल्या. हार्दिकने १७ चेंडूत २७ धावा केल्या. जडेजा ९ धावांवर नाबाद राहिला. टीम इंडियाने २० षटकात २०५ धावा कुटल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : कोणाच्या राशीत आज काय? वाचा राशीभविष्य

Fact Check : एअरफोन वापरल्याने चेहर्‍याला मारू शकतो लकवा? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Mrunal Thakur: आंखों ही आंखों में इशारा हो गया...

Bhumi Pednekar: भूमी पेडणेकरच्या नव्या लूकची चर्चा, नेटकऱ्यांनी उर्फीसोबत केली तुलना

Heart Attack Treatment : हार्ट अटॅकवर उपचार तुमच्या जवळच्या रुग्णालयात; मोफत औषध उपलब्धही होणार, जाणून घ्या सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT