Fact Check : एअरफोन वापरल्याने चेहर्‍याला मारू शकतो लकवा? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

earphone side effects : आता एअरफोन वापरणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. तुम्ही जर 'एअर फोन' आणि 'ईअर बड्स' वापरत असाल तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. तुमच्या चेह-याला लखवा होऊ शकतो. असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय. बरेचजण एअरफोन वापरतात. त्यामुळे हा दावा कितपत खरा आहे याची आम्ही पडताळणी केली.काय सत्य समोर आलं. चला पाहुया.
 एअरफोन वापरल्याने चेहर्‍याला मारू शकतो लकवा? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ
Earphones Side EffectsCanva
Published On

मुंबई : एअरफोन, इअरबड्स तुम्ही वापरत असाल तर ही बातमी पाहा आणि सावध व्हा... कारण, एअरफोनमुळे तुमच्या चेहर्‍याला लकवा मारू शकतो... चेहर्‍याला लखवा मारल्याने तोंड वाकडं होऊन बोलायला आणि जेवायलाही त्रास होऊ शकतो. त्यामुळे हा दावा खरा आहे का? याची आम्ही पडताळणी सुरू केली... पण त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

व्हायरल मेसेजमध्ये दावा करण्यात आला आहे की,'एअरफोन, ईयरबडच्या अतिवापरामुळे चेह-याला लकवा मारू शकतो.एअरफोन अधिक वेळ वापरल्याने बहिरेपणा, डोकेदुखी, टेन्शन, हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो'. हा दावा केल्याने याची पडताळणी करणं गरजेचं आहे. प्रत्येकाकडे मोबाईल असल्याने या दाव्याबाबत खरं काय हे जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल टीमने डॉक्टरांशी संपर्क साधला. त्यांना व्हायरल मेसेज दाखवला आणि एअरफोनमुळे चेहर्‍याला लखवा मारू शकतो का हे जाणून घेतलं.

 एअरफोन वापरल्याने चेहर्‍याला मारू शकतो लकवा? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ
Fact Check: 99 रुपयांत मिळणार दारू? सरकारने आणलं नवं मद्य धोरण? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? वाचा...

व्हायरल सत्य काय?

एअर फोन आणि इअरबडच्या वापरामुळे चेह-याला लकवा मारत नाही. हेडफोन, इअरबडच्या अतिवापरामुळे कानाचे त्रास होतात. कानदुखी, बहिरपेणा येणं, कानाचा एकाबाजूला भाग दुखणे आहे. टेन्शन, डोकं दुखणे असे परिणाम जाणवतात. कानात फंगस होणे यासारखे आजार होऊ शकतात. एअरफोनमुळे चेहर्‍याला लखवा मारत नाही हे स्पष्ट झालं मात्र, कानाचे त्रास उद्भवतात... त्यामुळे काय काळजी घ्यावी पाहुयात.

 एअरफोन वापरल्याने चेहर्‍याला मारू शकतो लकवा? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ
Fact Check : 25 वर्षांत 4 कोटी लोकांचा होणार मृत्यू? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? वाचा

एअरफोन वापरताना काय काळजी घ्यावी?

कमीत कमी वेळ हेडफोन किंवा एअरफोनचा वापर करावा. एअरफोनचा आवाजात कमी ठेवावा. एअरबड्स कानात व्यवस्थित बसणारे वापरावेत. एअरबड, एअरफोन हे जास्त वापरल्याने त्याचे गंभीर परिणाम जाणवतात. त्यामुळे त्याचा वापर कमी प्रमाणात करावा. कोरोना काळात ऑनलाईन काम करताना बरेचजण एअरफोन वापरत होते. त्यामुळे १० पैकी २ जणांना कानाचा त्रास जाणवत होता. एअरफोनचे अनेक दुष्परिणाम असल्यामुळे गरजेपुरताच एअरफोनचा वापर करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com