T20 World Cup 2024 IND vs CAN  x
Sports

T20 World Cup 2024: भारत-कॅनडा सामना पावसामुळे रद्द; आता‌ सुपर ८ मध्ये कोण कुणासोबत भिडणार? पाहा वेळापत्रक

T20 World Cup 2024 IND vs CAN: फ्लोरिडाचे मैदानावर ओलावा असल्याने सामना रद्द करण्यात आलाय. दरम्यान अ गटात टीम इंडिया अव्वल स्थानावर कायम आहे. आता सुपर ८ मधील पहिला सामना २० जून रोजी अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे.

Bharat Jadhav

फ्लोरिडा स्टेडियमवर होणाऱ्या भारत आणि कॅनडा सामना पावसामुळे रद्द झालाय. अंपायर्सने खेळपट्टीची तपासणी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय. नाणेफेक होण्याआधी पाऊस झाला होता. पावसामुळे खेळपट्टीवर पाणी सचलं होतं. खेळपट्टीवर सुकेपर्यंत अंपायर्सने प्रतीक्षा केली परंतु खेळीपट्टीवर ओलावा कायम असल्याने हा सामना रद्द करण्यात आलाय. अंपायर्सने दोन्ही संघांना पॉईट्स दिले आहेत. आता सुपर ८ मधील पहिला सामना २० जून रोजी अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे.

सामना पावसात वाहून गेला असला तरी दोन्ही संघांच्या सुपर-८ समीकरणावर कोणताही परिणाम होणार नाही कारण टीम इंडिया आधीच पात्र ठरलीय. तर कॅनडा आधीच स्पर्धे बाहेर गेलाय. आता भारतीय संघ २० जून रोजी पहिला सुपर-८ सामना खेळणार आहे. हा सामना अफगाणिस्तानविरुद्ध केन्सिंग्टन ओव्हल, बार्बाडोस येथे होणार आहे. आता परत सुपर-८ सामन्यात पाऊस पडला तर काय होईल? चला जाणून घेऊया सामन्याचा निकाल कसा लागेल.

वृत्तानुसार, ग्रुप-स्टेज सामन्यांप्रमाणे सुपर-८ सामन्यांमध्ये राखीव दिवसाची तरतूद नाहीये. म्हणजेच पाऊस पडल्यास कोणत्याही परिस्थितीत सामना त्याच दिवशी पूर्ण करावा लागेल. या स्थितीत सामन्याचा निकाल निश्चित करण्यासाठी ५-५ षटकांचा सामना खेळवला जाऊ शकतो.

जर पाऊस जास्त असल्याने ५-५ षटकांचाही सामनाही झाला नाही तर दोन्ही संघांना एक-एक पॉइंट दिला जाईल. जर सुपर ८ मध्ये प्रत्यके संघ जर ३-३ सामने खेळले असतील. आणि एकही सामना पावसामुळे रद्द झाला तर दोन्ही संघांचे नुकसान होणार आहे. कारण ग्रुप स्टेजनुसार त्याच्याकडे एक सामना कमी असेल.

तर १०- १० षटकांची सामना झाला हवा

पहिल्या सेमीफायनल आणि फायनलदरम्यान पाऊस पडल्यास त्याच दिवशी सामन्याचा निकाल लागण्यासाठी किमान १० षटकांचा सामना तरी झालेल्या असावा. करावी लागेल. हेही शक्य झाले नाही तर सामना राखीव दिवशी जाईल. पहिल्या सेमीफायनल आणि फायनलसाठी १९० मिनिटे आणि राखीव दिवसाची तरतूद आहे. पण दुसऱ्या सेमीफायनलच्या सामन्यासाठी २५० मिनिटे अतिरिक्त मिळतील. पण राखवी दिवस राहणार नाहीये. तर दुसरा सेमीफायनल आणि फायनल सामन्यात फक्त एका दिवसाचे अंतर असेल. दुसरा उपांत्य सामना २७ जूनला तर अंतिम सामना २९ जूनला होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bareli Protest : बरेलीत नमाजावेळी मोठा गोंधळ, शेकडो आंदोलक रत्यावर उतरले; पोलिसांचा लाठीचार्ज

Vastu Tips Of Lighting Diya: घरात या दिशेला ठेवू नये पेटता दिवा, ओढवेल मोठं संकट

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात! १३ चिमुकल्यांना घेऊन जाणारी व्हॅन खड्ड्यात पलटली अन् पुढे...

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

SCROLL FOR NEXT