T20 World Cup AUS Vs AFG Match Highlight: Saamtv
Sports

AUS Vs AFG: दुबळ्या अफगाणिस्तानने लोळवलं, ऑस्ट्रेलियाचं काय चुकलं? एकाकी झुंज देणारा 'हिरो' आऊट झाला अन् सामना फिरला; वाचा टर्निंग पॉईंट!

T20 World Cup AUS Vs AFG Match Highlight: २०२३ च्या एकदिवसीय वनडे विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानचा लाजिरवाणा पराभव केला होता. ऑस्ट्रेलियाच्या मॅचविनर फलंदाजाने एकाकी झुंज देत अफगाणिस्तानच्या हातातून सामना हिसकावला होता. या सामन्यातही तोच फलंदाज पुन्हा तसाच पराक्रम करेल असे वाटत होते. मात्र अफगाणिस्तानच्या गुलबदिन नायबने त्याचा काटा काढला अन् आख्खा सामना फिरला.

Gangappa Pujari

टी ट्वेंटी विश्वचषकामध्ये अफगाणिस्तान संघाने आठ वेळा चॅम्पियन ठरलेल्या बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव करत इतिहास रचला. या विजयासोबतच अफगाणिस्तानने २०२३ च्या वनडे वर्ल्डकपमध्ये झालेल्या लाजिरवाण्या पराभवाचाही वचपा काढला. विशेष म्हणजे २०२३ मध्ये ज्या खेळाडूने जबरदस्त खेळी करत अफगाणिस्तानच्या हातातून सामना हिसकावला होता. त्याचीच विकेट या सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरली. नेमकी कुठे फिरली मॅच? बलाढ्य ऑस्ट्रेलियाचं काय चुकलं? वाचा सविस्तर.

अवघ्या १४९ धावांचे लक्ष!

सामन्यामध्ये अफगाणिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना ६ विकेटवर १४८ धावा करत ऑस्ट्रेलियासमोर १४९ धावांचे लक्ष ठेवले होते. ऑस्ट्रेलियाकडे असलेले एकापेक्षा एक धुरंधर अन् एकहाती सामना फिरवण्याची क्षमता असलेले खेळाडू पाहता हे आव्हान फारच कमी होते. मात्र अफगाणिस्तानच्या दोन गोलंदाजांनी कांगारुंच्या आशा धुळीत मिळवल्या.

कुठे फिरली मॅच?

या धावसंख्येचा सामना करताना ऑस्ट्रेलियाने पॉवरप्लेमध्ये 32 धावांत तीन विकेट गमावल्या होत्या. मात्र कांगारुंचा मॅचविनर फलंदाज ग्लेन मॅक्सवेल एकाकी झुंज देत होता त्यामुळे कांगारुंची सामन्यावर पकड होती. याच मॅक्सवेलने २०२३ च्या वनडे वर्ल्डकपमध्ये वादळी द्वीशतकी खेळी करत अफगाणिस्तान संघाच्या हातातून सामना हिसकावला होता.

मॅक्सवेलची विकेट ठरली टर्निंग पॉईंट!

आता ही तो तसाच करिश्मा करणार असे वाटत होते. मात्र यावेळी आडवा आला अफगाणिस्तानचा गुलबदिन नायब! गुलबदिन नायबने अगदी निर्णायक क्षणी मॅक्सवेलचा बळी मिळवत संपूर्ण सामनाच फिरवून टाकला. मॅक्सवेलने 41 चेंडूत 59 धावांची खेळी केली, मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. या विजयासोबतच अफगाणिस्तानने वनडे विश्वचषकातील पराभवाचा हिशोबही चुकता केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Body Polls 2025 : स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीबाबत मोठी अपडेट; आयुक्तांनी दिली महत्वाची माहिती

MHADA Scheme : स्वस्त घराची संधी! ३१ ऑगस्टपर्यंत म्हाडा घरांसाठी अर्ज करा, सविस्तर प्रक्रिया जाणून घ्या

Maharashtra Live News Update : मोटरसायकल चोर पोलीस स्थानकातून फरार

Pune News: पुण्यात कोयता गँगचा उच्छाद, बाईकवरुन उतरताच दुकानं फोडली; पाहा VIDEO

Car insurance: वादळी पावसात कारवर झाड पडले तर विमा मिळतो का?

SCROLL FOR NEXT