T20 World Cup 2024 Australia Vs Afghanistan:  Saamtv
Sports

Aus Vs AFG: वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानचा भीम पराक्रम! बलाढ्य ऑस्ट्रेलियाला धुळ चारत इतिहास रचला; सुपर ८ साठी चुरस वाढली

T20 World Cup 2024 Australia Vs Afghanistan: विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तान संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव करत नवा इतिहास रचला आहे. या विजयासोबतच सुपर आठमधील शर्यतही आणखी रंगतदार झाली आहे.

Gangappa Pujari

टी- ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तान संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाला धुळ चारत नवा इतिहास रचला आहे. अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियासमोर १४९ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियांचा संघ अवघ्या १२७ धावा करुन गारद झाला. या ऐतिहासिक विजयासोबतच स्पर्धेतील सुपर ८ मधील शर्यत आणखी रोमांचक झाली आहे.

सामन्यामध्ये अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 गडी गमावून 148 धावा केल्या. अफगाणिस्तानकडून गुरबाज आणि झद्रान या सलामीच्या जोडीने 15.5 षटकात 118 धावा जोडल्या. 9 विकेट्स शिल्लक असताना अफगाणिस्तान आपली धावसंख्या खूप मोठी करेल असे वाटत होते. पण पहिल्या विकेटनंतर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी सामन्यावर पकड मजबूत केली.

ऑस्ट्रेलियासमोर 149 धावांचे लक्ष्य होते. त्यांच्या ताफ्यात असलेल्या एकापेक्षा एक स्फोटक फलंदाजांची यादी पाहून हे आव्हान अगदीच थोडे वाटत होते. मात्र अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी सर्वोत्तम कामगिरी करत कांगारुंच्या फलंदाजांना जेरीस आणले. ऑस्ट्रेलियाचा डाव १२१ धावांमध्ये आटोपला. ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेलने सर्वाधिक ५९ धावा केल्या. त्याच्याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाने 15 धावाही केल्या नाहीत.

गुलबदिन नायब आणि नवीन-उल-हक या अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी कांगारुंच्या फलंदाजांना घाम फोडला. गुलबदिनने 4 षटकात 20 धावा देत 4 बळी घेतले तर नवीनने देखील 4 षटकात 20 धावा देत 3 बळी घेतले. याशिवाय रशीद, ओमरझाई आणि नबी यांना प्रत्येकी 1 बळी मिळाला.

कमिन्सची हॅट्रिक व्यर्थ!

ऑस्ट्रेलियाच्या वतीने पॅट कमिन्सने या सामन्यातही हॅटट्रिक घेण्याचीही कामगिरी केली. अफगाणिस्तानविरुद्ध टी-20 क्रिकेट आणि टी-20 वर्ल्ड कपमध्ये बॅक टू बॅक हॅट्ट्रिक घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला. कमिन्स हा ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी गोलंदाज होता, त्याने 4 षटकात 28 धावा देत 3 बळी घेतले. त्याच्याशिवाय जम्पाला २ बळी मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT