AUS vs BAN, Highlights: ऑस्ट्रेलियाकडून बांगलादेशी वाघांची शिकार! कमिन्स- वॉर्नरच्या खेळीच्या बळावर मिळवला शानदार विजय

Australia vs Bangladesh, T20 World Cup 2024: ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने शानदार विजय मिळवला आहे.
AUS vs BAN, Highlights: ऑस्ट्रेलियाकडून बांगलादेशी वाघांची शिकार! कमिन्स- वॉर्नरच्या खेळीच्या बळावर मिळवला शानदार विजय
australia cricket teamafp

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील ४४ वा सामना ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा २८ धावांनी धुव्वा उडवला आहे. पावसामुळे व्यत्यय आलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने २८ धावांनी विजय मिळवला आहे. २९ धावा खर्च करत हॅट्ट्र्रिक घेणारा पॅट कमिन्स या सामन्याचा हिरो ठरला आहे.

हा सामना ऑस्ट्रेलियाने डकवर्थ लुईस नियमानुसार आपल्या नावावर केला आहे. या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या बांगलादेशने २० षटकअखेर ८ गडी बाद १४० धावा केल्या होत्या. बांगलादेशकडून फलंदाजी करताना नजमुल हुसेन शांतोने ३६ चेंडूंचा सामना करत ४१ धावांची खेळी केली. तर तौहिद हृदोयने २८ चेंडूंचा सामना करत ४० धावा चोपल्या. शेवटी लिटन दासने २५ चेंडूंचा सामना करत १६ धावा केल्याा आणि संघाची धावसंख्या १४० धावांवर पोहोचवली. ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना पॅट कमिन्सच्या गोलंदाजीची जादू पाहायला मिळाली. त्याने २९ धावा खर्च करत हॅट्रिक घेतली.

AUS vs BAN, Highlights: ऑस्ट्रेलियाकडून बांगलादेशी वाघांची शिकार! कमिन्स- वॉर्नरच्या खेळीच्या बळावर मिळवला शानदार विजय
IND vs AFG, Highlights: अफगाणिस्तानला तर हरवलं, मात्र या २ कारणांमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं

ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकण्यासाठी १४० धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने शानदार खेळी केली. त्याने दमदार सुरुवात करुन देत अर्धशतक झळकावलं. तर ट्रेविस हेडने २१ चेंडूंचा सामना करत २१ धावा केल्या. तर शेवटी ग्लेन मॅक्सवेलने नाबाद १४ धावा केल्या. ११.२ षटकांचा खेळ झाल्यानंतर पावसाने हजेरी लावली. त्यावेळी ऑस्ट्रेलियाची धावसंख्या २ गडी बाद १०० इतकी होती. मात्र त्यावेळी पार स्कोअर ७२ होता. ऑस्ट्रेलियाचा संघ पार स्कोअरपेक्षा २८ धावांनी पुढे होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा या सामन्यात सोपा विजय झाला.

AUS vs BAN, Highlights: ऑस्ट्रेलियाकडून बांगलादेशी वाघांची शिकार! कमिन्स- वॉर्नरच्या खेळीच्या बळावर मिळवला शानदार विजय
IND vs AFG: भारताची सुपर-8मध्ये विजय सलामी, सूर्या-बुमराहची तुफानी खेळी; अफगाणिस्तानचा 47 धावांनी उडवला धुव्वा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com