T20 World Cup 2022, Shoaib Akhtar, Team India SAAM TV
Sports

T20 World Cup 2022 : पाकिस्तान हरला, पण सगळा राग टीम इंडियावर काढला; शोएब अख्तरनं केली विखारी टीका

पाकिस्तानचा पराभव शोएब अख्तरच्या जिव्हारी लागलाय. त्याने टीम इंडियावरच राग काढलाय.

Nandkumar Joshi

T20 World Cup 2022 : क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे आणि त्याची प्रचिती टी २० वर्ल्डकपमध्ये येत आहे. आतापर्यंत पाच सामन्यांत धक्कादायक निकाल लागले आहेत. २७ ऑक्टोबरला पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात झालेल्या सामन्याचा निकालही धक्कादायक होता. तुलनेने कमकुवत असलेल्या झिम्बाब्वेने पाकिस्तानला पराभूत केलं. त्यामुळे पाकिस्तान संघातील खेळाडूंबद्दल माजी क्रिकेटपटूंमध्ये प्रचंड राग आहे.

पाकिस्तानचा (Pakistan) माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरही प्रचंड चिडला आहे. पाकिस्तानच्या पराभवाचा राग त्यानं टीम इंडियावर (Team India) काढला आहे. त्याने टीम इंडियाविरोधात विखारी टिप्पणी केली आहे. मी आधीच सांगितलंय की, पाकिस्तान या आठवड्यात वर्ल्डकप स्पर्धेतून मायदेशी परतणार आहे आणि टीम इंडिया पुढच्या आठवड्यात सेमिफायनलचा सामना खेळून स्पर्धेबाहेर जाईल, ते कुणी तीस मार खां नाहीत, असं शोएब म्हणाला.

टीम इंडियाची कामगिरी आतापर्यंत तरी लय भारी झालीय. ग्रुप २ मध्ये दोन्ही सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. (Cricket News)

झिम्बॉब्वेने रचला इतिहास

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ विकेट गमावून १३० धावा केल्या. माफक आव्हान असलं तरी, पाकिस्तानला ते पार करणं जमलं नाही आणि अवघ्या एका धावेने पराभूत व्हावे लागले.

झिम्बाब्वेने गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणही चांगले केले. त्यामुळे त्यांना विजय साकारता आला. या विजयानंतर आता पाकिस्तान टीम व्यवस्थापन आणि कर्णधार बाबर आझमवर टीका होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दारूचे पैसे न दिल्याने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण; घटना CCTVत कैद

Bus Accident : भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस १५ फूट खोल नदीत कोसळली, दोन जणांचा मृत्यू, २५ जण जखमी

Stamp Duty Government Decision: फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, सर्वप्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी लागणारे ₹500 चे मुद्रांक शुल्क माफ

Manoj Jarange: विठ्ठला... सरकारला सद्बुद्धी दे, मराठा आरक्षण लवकर मिळू दे, जरांगे पाटलांचे साकडे|VIDEO

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

SCROLL FOR NEXT