T20 World Cup 2022 India vs England Semifinal Match Saam Tv
Sports

IND vs ENG : T20 विश्वचषकात आज भारत-इंग्लंडमध्ये महामुकाबला; कोण कुणावर भारी? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड

टी-२० विश्वचषकात (T20 World Cup) आज भारत आणि इंग्लंडचे संघ भिडणार आहेत.

Satish Daud

T20 World Cup 2022 India vs England Semifinal Match : टी-२० विश्वचषकात (T20 World Cup)  आज भारत आणि इंग्लंडचे संघ भिडणार आहेत. दोन्ही संघांमधील हा सामना ओव्हल मैदानावर खेळवला जाईल. या सामन्यात जॉस बटलर इंग्लिश संघाचे नेतृत्व करणार आहे, तिथे टीम इंडियाची  (Team India)  जबाबदारी रोहित शर्माच्या खांद्यावर असेल. जर भारतीय संघाने हा सामना जिंकला तर 13 नोव्हेंबरला मेलबर्न येथे होणाऱ्या अंतिम फेरीत त्याचा सामना पाकिस्तानशी होईल.

सुपर-12 फेरीत टीम इंडियाने आपल्या गटात अव्वल स्थान मिळवून उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरला आहे. या सुवर्ण प्रवासात भारताने पाकिस्तान, नेदरलँड, बांगलादेश आणि झिम्बाब्वेचा पराभव केला. तर त्याला दक्षिण आफ्रिकेकडून पराभवाचा सामना करावा लागला. (Sports News)

इंग्लिश संघाबद्दल बोलायचे झाले, तर सुपर-12 फेरीत इंग्लंडने अफगाणिस्तान, न्यूझीलंड आणि श्रीलंकेचा पराभव केला. त्याचवेळी त्यांना आयर्लंडविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. यासोबतच ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणारा सामना पावसामुळे रद्द झाला. (India vs England Semifinal Latest Updates)

भारत-इंग्लंड कोण कुणावर भारी?

तसं पाहता भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत 22 टी 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. ज्यात भारताने 12 सामने जिंकले आहेत. तर 10 सामन्यांत इंग्लंडच्या संघाने बाजी मारली आहे. म्हणजे दोन्ही संघ आमने-सामने आले की मग काट्याची टक्कर पाहायला मिळते.

T20 विश्वचषकात दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत तीन सामने झाले असून त्यापैकी दोन सामने भारताने जिंकले आहेत. एका सामन्यांत (2009 विश्वचषक) टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

रोहितकडून मोठ्या खेळीची अपेक्षा

उपांत्य फेरीचा सामना जिंकण्यासाठी रोहित ब्रिगेडला तिन्ही विभागात चांगला खेळ दाखवावा लागणार आहे. खुद्द रोहित शर्मालाही चांगला खेळ दाखवावा लागणार आहे. रोहित शर्मा अतिशय खराब फॉर्ममध्ये आहे.

आतापर्यंतच्या पाच सामन्यांमध्ये 17.80 च्या सरासरीने रोहित फक्त 89 धावा करू शकला आहे. हार्दिक पंड्या, केएल राहुल, दिनेश कार्तिक या खेळाडूंमध्येही सातत्याचा अभाव आहे. भारतासाठी चांगली गोष्ट म्हणजे विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांचा फॉर्म, जे फलंदाजीत सातत्यपूर्ण कामगिरी दाखवत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT