T20 World Cup : न्यूझीलंडला पराभूत करत पाकिस्ताननं आज टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. उद्या भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना होणार आहे. अॅडलेड मैदानावर हा सामना रंगणार आहे. टीम इंडिया जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. भारतीय संघाने आतापर्यंत सांघिक कामगिरी करत सेमिफायनल गाठली आहे. मात्र सूर्यकुमार यादववर सर्वांच्या नजरा असतील. सूर्यकुमार यादव इंग्लंडसाठी मोठी डोकेदुखी ठरु शकतो.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, इंग्लंड संघाने सूर्यकुमार यादवला रोखण्यासाठी अॅडलेडमध्ये मीटिंग घेतली. या मीटिंगमध्ये एकूण 6 जणांचा सहभाग होता. कर्णधार जोस बटलरनेही याला दुजोरा दिला. (Sports News)
जोस बटलर म्हणाला की, 'आम्ही सूर्याविषयी चर्चा करत होतो. तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे पण त्याला रोखण्यासाठी आम्ही योजना आखत आहोत. आशा आहे की आमचा प्लान यशस्वी होईल. सूर्यकुमार यादवची अतरंगी फटकेबाजी इंग्लंडसाठी मोठी समस्या आहेत.
इंग्रजी माध्यमांच्या वृत्तानुसार, सूर्यकुमारला रोखण्यासाठी 6 जणांनी बैठक घेतली. त्यात मॅथ्यू मॉट, कार्ल हॉपकिन्सन, मायकल हसी, डेव्हिड सेकर या प्रशिक्षकांचा समावेश होता. याशिवाय कर्णधार जोस बटलर आणि बेन स्टोक्सनेही सूर्याला रोखण्याचा डाव आखला आहे. जोस बटलरने म्हटलं की, सूर्यकुमारची फलंदाजी पाहण्यात मजा येते. त्याच्याकडे अनेक शॉट्स आहेत. पण एका फलंदाजाला आऊट करण्यासाठी तुम्हाला फक्त एका चेंडूची गरज आहे आणि आम्ही त्यासाठी प्रयत्न करू.
इंग्लंडकडे वेगवान आणि फिरकी आक्रमण असलं तरी सूर्यकुमार यादव दोन्ही प्रकारच्या गोलंदाजांना चांगलं खेळतो. मार्क वुडचा वेग तो अधिक चांगल्या पद्धतीने वापरू शकतो. नुकतेच इंग्लंड दौऱ्यावर सूर्यकुमार यादवने नॉटिंगहॅम टी-20 मध्ये इंग्लंडविरुद्ध शतक झळकावले होते.
यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये सूर्यकुमार सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. सूर्यकुमारने 75 च्या सरासरीने 225 धावा केल्या आहेत. ज्यात 3 अर्धशतकांचा समावेश आहे. सूर्यकुमार यादवचा स्ट्राईक रेट 190 पेक्षा जास्त आहे, जो गोलंदाजांसाठी मोठा धोका आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.