India vs Pakistan T20 world cup 2022 Final
India vs Pakistan T20 world cup 2022 Final Saam TV
क्रीडा | IPL

T20 World Cup : २००७ ची पुनरावृत्ती होणार? भारत-पाकिस्तान फायनलमध्ये भिडणार? जाणून घ्या समीकरण

Satish Daud-Patil

T20 World Cup 2022 : टी-२० विश्वचषक स्पर्धेत रविवारी (६ नोव्हेंबर) मोठा उलटफेर झाल्याचं पाहायला मिळालं. स्पर्धेत दुबळ्या मानल्या जाणाऱ्या नेदरलँड्स संघाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा १३ धावांनी पराभव केला. या पराभवासह दक्षिण आफ्रिकेचा संघ विश्वचषक स्पर्धेतून जवळपास बाहेर फेकला गेला आहे. तर आफ्रिकेच्या पराभवामुळे भारतीय संघाला (Team India) थेट सेमीफायनलचं तिकीटं मिळालं आहे.

याशिवाय बांग्लादेश आणि पाकिस्तान संघाच्या सेमीफायनलमध्ये पोहचण्याच्या आशा देखील जिवंत झाल्या आहेत. रविवारचा दुसरा सामना बांग्लादेश आणि पाकिस्तान संघात सुरू झाला आहे. या सामन्यांत बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हा सामना जिंकणारा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करेल. (Cricket News)

भारत-पाकिस्तान फायनल लढत होणार?

दक्षिण आफ्रिकेच्या पराभवामुळे भारतीय संघाला थेट सेमीफायनलचं तिकीट मिळालं आहे. भारताचा अजूनही साखळी फेरीतील एक सामना बाकी आहे. भारतीय संघाने जर या सामन्यांत विजय मिळवला तर ते गृप ब मधून टॉप करतील. म्हणजे काय तर त्यांचा सामना गृप अ मधील इंग्लंड संघासोबत होईल.

दुसरीकडे आजच्या सामन्यांत पाकिस्तानने बांग्लादेशला नमवलं. तर ते गृप ब मध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहचतील. सेमीफायनलमध्ये त्यांचा सामना गृप अ मधील नंबर एकचा संघ न्यूझिलंडविरोधात होईल. त्यामुळे जर पाकिस्तानने न्यूझिलंडला आणि भारताने इंग्लंडच्या संघाचा पराभव केला तर पुन्हा एका विश्वचषकात भारत-पाकिस्तान (IND vs PAK) आमने सामने येतील.

२००७ ची पुनरावृत्ती होणार?

२००७ मध्ये पहिली वहिली टी-२० विश्वचषक स्पर्धा संपन्न झाली. त्यावेळी भारत, पाकिस्तान एकाच गटात होते. गट साखळीत भारतानं पाकिस्तानला पराभूत केलं. सुपर ८ मध्ये भारत न्यूझीलंडकडून पराभूत झाला. पण इंग्लंड, दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारतानं उपांत्य फेरी गाठली.

दुसरीकडे पाकिस्ताननं श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, बांगलादेशचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत पाकिस्ताननं न्यूझीलंडचा, तर भारतानं ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान अंतिम फेरीत पोहोचले. हा सामना जिंकत भारतानं स्पर्धा जिंकली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips: घरात मनी प्लांट लावताना या चुका टाळा; अन्यथा प्रगती थांबेल

Today's Marathi News Live: ४ जूननंतर अच्छे दिनाची सुरुवात होईल - उद्धव ठाकरे

Khadakwasla Dam Water Level: पुणेकरांना दिलासा, पाणीकपातीचे संकट टळलं; जाणून घ्या खडकवासला धरण साखळी पाणीसाठ्याची स्थिती

Chardham Yatra Bus Accident | बुलढाण्यातून चारधाम यात्रेसाठी गेलेल्या भाविकांच्या बसला भीषण आग

Soami Bagh Mausoleum : सेम टू सेम ताजमहालच! बांधकामाला १०० हून अधिक वर्षांचा काळ; पर्यटकांचं ठरतंय आकर्षण

SCROLL FOR NEXT