Hardik Pandya- Suryakumar Yadav SAAM TV
क्रीडा

T 20 World Cup: हार्दिक पंड्या की सूर्यकुमार यादव? वर्ल्डकपमध्ये सर्वात मोठा गेमचेंजर कोण ठरणार?

गेमचेंजर म्हणून हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव या दोघांची नावे आघाडीवर आहेत.

Nandkumar Joshi

T 20 World Cup | मुंबई: टी २० वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. आता या मोठ्या स्पर्धेसाठी टीम इंडिया कोणती रणनीती आखणार अशी चर्चा सुरू झाली आहे. भारतीय संघात असे काही खेळाडू आहेत की, एकट्याच्या जोरावर संघाला स्पर्धेचे जेतेपद मिळवून देऊ शकतात. त्यात हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादवचं नाव आघाडीवर आहे.

टीम इंडियाची (Team India) घोषणा नुकतीच झाली आहे. संघ निवडीवरून अनेक दिग्गजांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. विशेषतः मोहम्मद शमीला राखीव ठेवण्यात आल्यानं निवड समितीकडे बोट दाखवले जात आहे. त्याचवेळी संघात अशा काही खेळाडूंचा भरणा आहे, जे एकट्याच्या जोरावरही संघाला स्पर्धा जिंकवून देऊ शकतात. अनेक दिग्गज खेळाडूंनीही याबाबत भाष्य केले आहे. अशा वेळी दोन खेळाडूंचं नाव आघाडीवर आहे.

३६० डीग्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सूर्यकुमार यादवचं (Suryakumar Yadav) नाव आघाडीवर आहे. त्यानंतर हार्दिक पंड्या (Hardik Pandya). गेल्या काही महिन्यांपासून हे दोन्ही खेळाडू टीम इंडियासाठी तारणहार ठरलेले आहेत. त्यांच्या अलीकडच्या खेळी स्पेशल ठरल्या आहेत.

सूर्यकुमार यादवने टी २० मध्ये शतकही झळकावले आहे. तर हार्दिक पंड्याने जोरदार वापसी करून संघाला विजय मिळवून दिलेला आहे. ऑस्ट्रेलियाच्या भूमीत टी २० वर्ल्डकप जिंकण्यासाठी भारतीय संघ सर्वस्व पणाला लावेल यात शंकाच नाही. पण जेतेपद मिळवून देणारा खेळाडू कोण ठरणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

सूर्यकुमार तळपणार

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणारा सूर्यकुमार यादव याने टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खूप उशिरा पदार्पण केले. मात्र, ज्यावेळी त्याला संधी मिळाली, त्याने तिचे सोने केले. टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात आक्रमक खेळाडू म्हणून त्याची ओळख झालेली आहे. आतापर्यंत त्याने ६ अर्धशतके आणि एक शतक केले आहे. सूर्यकुमारने ४५ षटकार आणि ७६ चौकार ठोकले आहेत. त्याचा स्ट्राइक रेटही जबराट आहे. प्रतिस्पर्धी संघाला धडकी भरवणारी खेळी करण्याची क्षमता त्याच्यात आहे.

हार्दिक पंड्याची जादू चालणार

टी २० वर्ल्डकप २०२१ मध्ये हार्दिक पंड्याची सुमार कामगिरी झाली होती. गोलंदाजी तर नाहीच, शिवाय त्याच्या बॅटमधूनही अपेक्षित धावा निघू शकल्या नव्हत्या. मात्र, आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. हार्दिक पंड्या दुखापतीतून सावरल्यानंतर त्यानं पुनरागमन केलं आहे आणि त्याची कामगिरी पाहून सगळेच अवाक् झाले आहेत. आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचं नेतृत्व करताना त्याने जेतेपद मिळवून दिले. अलीकडच्या आशिया कपमध्येही त्याने पाकिस्तानविरुद्ध मॅच विनिंग खेळी केली. अशा वेळी टी २० वर्ल्डकपसारख्या मोठ्या स्पर्धेत हार्दिकची जादू चालली तर, संघाला विजेतेपद मिळवून देऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'एक है तो अदानी सेफ है'; राहुल गांधींचा मोदी-शाहांवर हल्लाबोल

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

SCROLL FOR NEXT