नरेश शेंडे
टीम इंडियाने वेस्ट इंडीजच्या विरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात सूर्यकुमार यादवला सलामीसाठी पाठवले. सूर्यकुमारने या सामन्यात चांगली खेळी केली. भारताने हा सामना ६८ धावांनी जिंकला.
ईशान किशनने याचदरम्यान १३ टी-२० मध्ये ३ अर्धशतक ठोकले. ऋतुराज गायकवाडने ६ सामन्यांत एक अर्धशतक आणि संजू सॅमसनने २ सामन्यांत एक अर्धशतक ठोकलं आहे.
कर्णधार रोहित शर्माने २०२२ मध्ये टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात चांगली कामगिरी केली नाही. रोहितने ९ सामन्यात २७ च्या सरासरीनं २३९ धावा केल्या आहेत.
के एल राहुलने टी-२० सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. आयपीएल २०२२ मध्ये राहुलने दोन शतकांची खेळी साकारत ६०० हून अधिक धावा कुटल्या.
टी-२० विश्वचषक यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये ऑस्ट्रेलियात होणार आहे. या विश्वचषकात के एल राहुलच्या जागेवर टीम मॅनेजमेंट सलामीवीर खेळाडूचा पर्याय शोधत आहे.
के एल राहुलच्या जागेवर २०२२ मध्ये आतापर्यंत सलामीसाठी सूर्यकुमार यादव, ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, दीपक हुड्डा आणि ऋषभ पंतला संधी देण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.