virat kohli
virat kohli  saam tv
क्रीडा | IPL

विराट कोहली फॉर्मात आला असतानाच पाकिस्तानी खेळाडूचा निवृत्तीचा सल्ला, म्हणाला...

साम वृत्तसंथा

मुंबई: पाकिस्तानचा (Pakistan) माजी कर्णधार शाहीद आफ्रिदी यानं टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहलीला निवृत्तीबाबत सल्ला दिला आहे. विराट कोहलीनं योग्य वेळी निवृत्तीचा निर्णय घ्यावा, असं आफ्रिदीनं सांगितलंय.

विराट कोहलीचा (Virat Kohli) गेल्या काही वर्षांपासून सूर हरवला होता. त्याच्या बॅटमधून पूर्वीसारख्या धावा निघत नव्हत्या. हजार दिवस उलटून गेले तरी, त्याच्या बॅटमधून शतकी खेळी साकारली गेली नव्हती. नुकत्याच झालेल्या आशिया चषक स्पर्धेत मात्र, विराट कोहलीला सूर गवसला आणि क्रिकेट चाहत्यांमध्ये पुन्हा उत्साह पाहायला मिळाला. विराट कोहलीमध्येही वेगळाच कॉन्फिडन्स दिसून आला. आशिया चषक स्पर्धेत त्यानं शतक झळकावलं.

विराट कोहली (Virat Kohli) फॉर्मात आला असला तरी, पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूनं त्याला निवृत्तीबाबत सल्ला दिला आहे. विराट कोहलीनं ज्या प्रमाणे आपल्या करिअरची सुरुवात केली. त्याच पद्धतीने तो आपली कारकिर्द थांबवेल अशी अपेक्षा आहे. योग्य वेळी विराट कोहलीनं निवृत्त व्हायला हवं. ज्यावेळी तो यशाच्या शिखरावर असेल त्यावेळीच त्याने निवृत्तीचा निर्णय घ्यावा, असं आफ्रिदीनं म्हटलं आहे.

शाहीद आफ्रिदी एका वाहिनीशी बोलताना म्हणाला की, संघातून बाहेर काढायची वेळ यावी असं व्हायला नको. पण त्यापेक्षा जेव्हा तुम्ही यशाच्या शिखरावर असता त्यावेळी निवृत्तीची घोषणा करायला हवी. असं कधीतरीच घडतं. पण असे खूपच कमी खेळाडू आहेत. विशेषतः आशियाई देशातील क्रिकेटर असे निर्णय घेतात. पण विराट हा योग्य वेळी निर्णय घेईल असे वाटते. ज्या प्रमाणे त्याने करिअरची सुरुवात केली, तशीच तो आपल्या कारकिर्दीचा शेवटही करेल, असे वाटते.

दुसरीकडे, शाहीद आफ्रिदीच्या सल्ल्यावर टीम इंडियाचा खेळाडू अमित मिश्रा याने प्रतिक्रिया दिली आहे. काही लोक केवळ एकदाच संन्यास घेतात. त्यामुळे कृपया विराट कोहलीला या सगळ्यापासून वेगळे राहू दे, असे मिश्राने म्हटले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : रवींद्र वायकर आज उमेदवारी अर्ज भरणार

Maharashtra Weather Update: महाराष्ट्र तापला! कोकणासह मराठवाड्यात उष्णतेची लाट, 'या' ठिकाणी पावसाची शक्यता

Health Insurance: आरोग्य विम्याचा लाभ मिळेना; ४३ टक्के लोकांचे दावे रखडले, अहवालातुन धक्कादायक खुलासा

Crying Benefits : काय सांगता! रडणे देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे; वाचा अश्रूंचं महत्व

Summer Tips: कडक उन्हातून घरी आल्यावर या '५' गोष्टींची घ्या काळजी; नाहीतर

SCROLL FOR NEXT