Suryakumar Yadav Ishan Kishan saam tv
Sports

IND vs WI : 'करो या मरो'च्या सामन्यात सूर्याचा मास्टरस्ट्रोक! टॉस जिंकला पण विंडीजच्या ताफ्यात खळबळ, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग-11

India vs West Indies do or die match playing XI : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज करो या मरो सामन्यात सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दोन्ही संघांसाठी उपांत्य फेरी गाठण्यासाठी विजय अत्यावश्यक असून इडन गार्डनवर हायस्कोरिंग लढत होण्याची शक्यता.

Namdeo Kumbhar

India vs West Indies live score : 'करो या मरो'च्या सामन्यात भारताचा कर्णधार सुर्यकुमार यादव याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी भारत आणि वेस्ट इंडिज दोन्ही संघाला विजय अनिवार्य आहे. अटीतटीच्या सामन्यात सुर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून विडिंजला फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. वेस्ट इंडिजच्या संघात एक बदल करण्यात आला आहे. भारतीय संघाने प्लेईंग ११ मध्ये कोणताही बदल केलेला नाही.

पाहूयात दोन्ही संघाची प्लेईंग ११ कशी आहे?

भारतीय संघ -

अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, वरूण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग

India XI: 1 Abhishek Sharma, 2 Sanju Samson (wk), 3 Ishan Kishan, 4 Suryakumar Yadav (capt), 5 Tilak Varma, 6 Hardik Pandya, 7 Shivam Dube, 8 Axar Patel, 9 Arshdeep Singh, 10 Varun Chakravarthy, 11 Jasprit Bumrah

वेस्ट इंडिज -

रोस्टन चेस, शाई होप (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, शेरफेन रदरफोर्ड, जेसन होल्डर, रोमारिओ शेफर्ड, मॅथ्यू फोर्ड, गुडाकेश मोटी, अकिल होसेन आणि शमार जोसेफ

West Indies XI: 1 Roston Chase, 2 Shai Hope (capt & wk), 3 Shimron Hetmyer, 4 Rovman Powell, 5 Sherfane Rutherford, 6 Jason Holder, 7 Romario Shepherd, 8 Matthew Forde, 9 Gudakesh Motie, 10 Akeal Hosein, 11 Shamar Joseph.

सूर्यकुमार यादव काय म्हणाला ?

पिच चांगले आहे. या मैदानावर धावांचा पाठलाग होईल असे दिसतेय. दुसऱ्या डावात दव पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे फलंदाजी अधिक चांगली होईळ. मैदानातील वातावरण आधीच उत्साही आहे. मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे आणि आशा आहे की आम्ही प्रेक्षकांना चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न करू. थोडा तणाव आणि धाकधूक आहेच, पण दबाव नसेल तर मजा येत नाही, असे सूर्या म्हणाला.

वेस्ट इंडिजचा कर्णधार काय म्हणाला ?

दुसरीकडे वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होपने यालाही नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करायची होती. नाणेफेकीनंतर होप म्हणाला की, वेस्ट इंडिजने टॉस जिंकला असता तर प्रथम गोलंदाजीच निवडली असती. आम्हाला सातत्यपूर्ण खेळ करावा लागेल आणि जेव्हा गरज असेल तेव्हा सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. आजचा सामना आमच्यासाठी 'करा किंवा मरा' (Do or die) असा आहे.

पिच रिपोर्ट :

कोलकाताचे इडन गार्डन मैदानात धावांचा पाऊस पडतो. आऊटफील्ड सर्वात वेगवान मैदानांपैकी एक आहे.  त्यामुळे हा सामना हायस्कोरिंग होण्याची शक्यता आहे. मॅथ्यू हेडन यांनी आजच्या खेळपट्टीबाबत टीव्हीवर माहिती दिली. ते म्हणाले की, या खेळपट्टीवर मोठ्या प्रमाणात गवत आहे आणि खेळपट्टीची एक बाजू दुसऱ्या बाजूच्या तुलनेत जास्त कोरडी आहे. थोडक्यात सांगायचे तर हे मैदान षटकारांची आतषबाजी होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajysabha Election: ठाकरे-पवारांना फडणवीस धक्का देणार? राज्यसभेच्या सातही जागा लढवणार; या नावांची चर्चा?

Maharashtra Live News Update: दुबईत अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने घेतला पुढाकार

Chandra Grahan: ३ मार्चला ग्रहणात पारंपरिक समजुतीनुसार कोणत्या गोष्टी करणे टाळाव्यात?

Murmura Recipe : मुठभर तांदळापासून घरीच बनवा टोपभर मुरमुरे, लहान मुलांसाठी पौष्टिक नाश्ता

IND vs WI: एकही बॉल न खेळता टीम इंडिया सेमी फायनलमधून आऊट होणार? ICCचा काय आहे नियम? का होणार लागू?

SCROLL FOR NEXT