सूर्यकुमार यादवला कर्णधारपदावरून हटवण्यात आलं आहे, असे मीडिया रिपोर्ट्समध्ये सूत्रांच्या हवाल्यानं म्हटलं आहे.  saam tv
Sports

Suryakumar Yadav : वर्ल्डकपविजेता कर्णधार सूर्यकुमार यादवला हटवलं; टी २० संघातही स्थान नाही- रिपोर्ट्स

Suryakumar Yadav removed from India T20 captaincy report : टी २० वर्ल्डकपविजेता सूर्यकुमार यादव याला कर्णधारपदावरून हटवण्यात आलं आहे. धक्कादायक म्हणजे भारताच्या टी २० संघातही त्याला स्थान मिळणार नाही, असं वृत्त आहे.

Saam Tv

टी २० वर्ल्डकप विजेता कर्णधार सूर्यकुमार यादवला पदावरून हटवण्यात आलं आहे. तसेच टी २० संघातही स्थान देणार नसल्याचे वृत्त आहे. इंडियन एक्स्प्रेसनं बीसीसीआयच्या वरिष्ठ सूत्रांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे. सूर्यकुमारच्या नेतृत्वातच भारतीय संघानं तीन महिन्यांपूर्वी वर्ल्डकप स्पर्धेचे विजेतेपद पटकावलं होतं.

इंडियन एक्स्प्रेसने बीसीसीआयच्या वरिष्ठ सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयने आता भारतीय टी २० संघाच्या भवितव्यासाठी नव्या कर्णधाराच्या निवडीचा विचार सुरू केला आहे. संघ व्यवस्थापन आणि निवड समितीसोबत चर्चा केल्यानंतर लवकरच टी २० संघाच्या कर्णधाराच्या नावाची घोषणा केली जाणार आहे.

बीसीसीआयच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले की, निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याच्यासोबत चर्चा केल्यानंतर भारतीय टी २० संघाचं नेतृत्व नव्या कर्णधाराकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघानं टी २० वर्ल्डकप जिंकला होता. मात्र, त्याची वैयक्तिक कामगिरी आणि संघाच्या भवितव्याचा विचार केल्यानंतर नव्या कर्णधारासोबत पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबाबत लवकरच सूर्यकुमार यादवला कळवले जाईल, अशी माहितीही वरिष्ठ सूत्रांनी दिली.

सूर्यकुमार यादव यानं कर्णधार म्हणून भारतीय संघाला २०२४ नंतर झालेल्या टी २० मालिकांमध्ये विजय मिळवून दिला आहे. त्याच्या नेतृ्त्वात भारतीय संघाने वर्ल्डकप जिंकला आहे. मात्र, त्याची वैयक्तिक कामगिरी साजेशी झाली नाही. २०२३ पर्यंत जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या सूर्याची कामगिरी २०२४ आणि २०२५ मध्ये फारशी चांगली होऊ शकली नाही. २०२६ मध्ये सूर्यकुमार यादवने १४ टी २० सामन्यांमध्ये ४४ च्या सरासरीने ४८४ धावा केल्या. मात्र, मॅच विनर म्हणून तो कुठेच दिसला नाही. यावर्षी त्याने फक्त ४ अर्धशतके झळकावली. आयपीएल स्पर्धेतही त्याची कामगिरी चांगली झाली नाही. १३ डावांमध्ये त्याने अवघ्या २७० धावा केल्या. त्याची धावांची सरासरी फक्त २०.७६ होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Padma Awards: रोहित शर्मा, आर. माधवन यांच्यासह महाराष्ट्रातील 7 मान्यवरांना 'पद्म' पुरस्कार प्रदान

गुटखा मिळत नसल्याने कॅब चालकाचं डोकं फिरलं! आयुक्त तुकाराम मुंढेंना शिवीगाळ, आक्षेपार्ह व्हिडिओ केला व्हायरल

कुछ बडा होने वाला है! भाजप ३ राज्यातील मुख्यमंत्र्यांना CM पदावरून हटवणार; माजी मुख्यमंत्र्यांच्या दाव्यानं राजकारणात खळबळ

कृषी दिनी राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांचे वितरण; १८९ शेतकरी, संस्था व कृषी अधिकाऱ्यांचा होणार सन्मान

प्रियकराच्या मदतीने होणाऱ्या नवऱ्याची हत्या, लोहगडावर फिरायला नेऊन केतन अग्रवालचा घात

SCROLL FOR NEXT