Suryakumar Yadav Joked With Shivam Dube SAAM TV
Sports

Suryakumar Yadav: CSK च्या विजयानंतर सूर्याने उडवली शिवम दुबेची खिल्ली? Insta स्टोरी पोस्ट करत धोनीवरही साधला निशाणा

Suryakumar Yadav Joked With Shivam Dube: लखनऊविरूद्ध चेन्नई सुपर किंग्जने विजय मिळवला. या सामन्यानंतर मुंबई इंडियन्सचा खेळाडू सूर्यकुमार यादवने शिवम दुबे आणि महेंद्र सिंह धोनीची मजा घेतलीये.

Surabhi Jayashree Jagdish

मुंबई इंडियन्सचा खेळाडू सूर्यकुमार यादव सोशल मीडियावर चांगलाच एक्टिव्ह असतो. यावेळी सूर्या आयपीएलमध्ये केवळ आपल्याच नाही तर इतर टीमच्या खेळाडूंवरही त्याचं लक्ष असतं. अशातच चेन्नई सुपर किंग्जचा खेळाडू शिवम दुबेची सूर्याने फिरकी घेतली आहे. सूर्याने त्याच्या सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत धोनी आणि दुबेची मजा घेतलीये

सूर्यकुमार यादवने त्याच्या इन्टाग्रामवर स्टोरीवर शिवम आणि महेंद्र सिंह धोनीचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये संवाद लिहिलाय. यामध्ये, माही भाई- स्ट्राईक दिल्यानंतर तु करून घेशील का? दुबे- ट्राय करेन. माही भाई- ट्राय करायचं असेल तर मी करेन, तू फक्त रन आऊट करू नकोस.

दरम्यान सूर्याची ही स्टोरी चाहत्यांना फार आवडली आहे. शिवम दुबे आणि सूर्यकुमार यादव एकमेकांचे चांगले मित्र आहे. दोघंही स्थानिक क्रिकेट मुंबईच्या टीमकडून खेळतात. टीम इंडियामध्ये असताना देखील दोघंही खूप-मजा मस्ती करतात.

लखनऊविरूद्ध दुबेची खेळी

लखनऊ सुपरजाएंट्सविरूद्धच्या सामन्यात शिवम दुबेने ४३ रन्सची खेळी केली. मात्र त्याची ही खेळी काहीशी संथ होती. दुबेने ३७ चेंडूंमध्ये ही ४३ रन्सची खेळी केली. यामध्ये ३ फोर आणि २ सिक्सेसचा समावेश होता. शिवम दुबेसह कर्णधार महेंद्रसिंग धोनीने ११ चेंडूंमध्ये २६ रन्स केले.

लखनऊ सुपर जाएंट्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज विरूद्धच्या सामन्यात लखनऊने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० ओव्हर्समध्ये ७ विकेट्स गमावून १६६ रन्सचा स्कोर केला. यावेळी लखनऊकडून कर्णधार ऋषभ पंतने ४९ बॉल्समध्ये ६३ रन्सची खेळी केली. तर सीएसकने ५ विकेट्स गमावून १६८ रन्स करत सामना शिखात घातला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Gold Rate: सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी, १० तोळ्याच्या दरात ६००० रुपयांनी घसरण, आजचे दर किती?

Maharashtra Live News Update: संगमनेरमध्ये स्कूल बसला अपघात

Mumbai Police News : आलिशान कारमधून आले अन् टपरी चालकाला उचलून नेलं, मुंबईतील २ पोलिसांना बेड्या

Maharashtra Politics: मीरा-भाईंदरमध्ये भाजपला मोठा धक्का, मराठी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्याचा मनसेत प्रवेश|VIDEO

Abhijeet Khandkekar Wife: फेसबुकवर मैत्री नंतर लग्न केलं; कोण आहे अभिजीत खांडकेकरची पत्नी?

SCROLL FOR NEXT