Suryakumar Yadav MI VS LSG X
Sports

Suryakumar Yadav : सूर्या दादाचा नाद करायचा नाय... ऑरेंज कॅप मिळवत SKY ने रचला मोठा विक्रम

Suryakumar Yadav Mumbai Indians : मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स हा सामना सुरु आहे. या सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्ये मुंबईने फलंदाजी केली. सूर्यकुमार यादवने अर्धशतकीय खेळी करत विक्रम रचला.

Yash Shirke

Suryakumar Yadav MI : वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स हा सामना रंगला आहे. या सामन्यामध्ये रिषभ पंतने टॉस जिंकला आणि लखनऊने प्रथम गोलंदाजी केली. फलंदाजी करताना मुंबईच्या शिलेदारांनी २० ओव्हर्समध्ये २१५ धावा केल्या. सूर्यकुमार यादवने या सामन्यामध्ये अर्धशतकीय खेळी करत नवा विक्रम रचला.

रोहित शर्मा चांगल्या फॉर्ममध्ये होता. मयंक यादवच्या ओव्हरमध्ये दोन कडक षटकार मारले. पण त्याच ओव्हरमध्ये रोहित १२ धावा करुन बाद झाला. रियान रिकेल्टन आणि विल जॅक्स यांनी खेळ पुढे नेला. रिकेल्टन ५८ धावा करुन माघारी परतला. त्यानंतर सूर्यकुमार यादव मैदानात उतरला. विल जॅक्सच्या विकेटनंतर तिलक वर्मा-हार्दिक पंड्या फलंदाजीसाठी आले, पण लवकर बाद झाले. तेव्हा मधल्या ओव्हर्समध्ये मोर्चा सांभाळत सूर्यकुमार यादवने वादळी अर्धशतक ठोकले.

२८ चेंडूंमध्ये ५४ धावा करत सूर्याने नवा विक्रम केला. सूर्यकुमार यादव हा आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद ४,००० धावा करणारा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने २७१४ चेंडू खेळताना ४००० धावा पूर्ण केल्या आहेत. याशिवाय सध्याचा आयपीएल २०२५ मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज सूर्यकुमार यादव हा आहे. इनिंगनंतर त्याच्याकडे ऑरेंज कॅप सुपूर्त करण्यात आली. सूर्याने या सीझनमध्ये आत्तापर्यंत ४२७ धावा केल्या आहेत.

मुंबईने २१५ धावांचा पल्ला गाठला खरा पण लखनऊच्या गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली. दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन करणाऱ्या मयंक यादवने रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या यांना बाद केले. मयंक प्रमाणे आवेश खानने देखील २ विकेट्स घेतल्या. रवी बिश्नोई, दिग्वेश राठी आणि प्रिन्स यादव यांनी प्रत्येकी १ अशा ३ विकेट्स घेतल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT