MI VS LSG : 6,6,..W.. उभ्या-उभ्या मारले दोन दमदार षटकार, एक चूक अन् इन-फॉर्म रोहित शर्मा झाला आउट, Video Viral

Rohit Sharma : मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स या सामन्यामध्ये रोहित शर्मा फक्त १२ धावांवर बाद झाला. त्याने मयंक यादवच्या ओव्हरमध्ये सलग दोन दमदार षटकार मारले. पण त्याच ओव्हरमध्ये रोहित बाद झाला.
Rohit Sharma MI VS LSG
Rohit Sharma MI VS LSGX
Published On

IPL 2025 च्या सुरुवातीला रोहित शर्मा खराब फॉर्ममध्ये होता. चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात त्याने नाबाद ७६ धावा केल्या. त्यानंतर लगेच सनरायजर्स हैदराबादच्या सामन्यामध्येही रोहितने चांगली कामगिरी केली. त्याने ७० धावा केल्या. पण आजच्या (२७ मार्च) मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स सामन्यामध्ये रोहित फक्त १२ धावा करुन माघारी परतला.

मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स हा सामना सध्या वानखेडे स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यामध्ये लखनऊचा कर्णधार रिषभ पंतने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचे निवडले. परिणामी रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन सलामीसाठी मैदानात उतरले. लखनऊचा हुकुमी एक्का मयंक यादवने दुखापतीनंतर आजच्या सामन्यात पुनरागमन केले. तो सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये गोलंदाजीसाठी आला.

Rohit Sharma MI VS LSG
MS Dhoni : ना धड कॅप्टनसी, ना परफॉर्मन्स; तरीही थाला पुढची IPL खेळणार, जवळच्या व्यक्तीने दिली माहिती

मयंक यादव विरुद्ध रोहित शर्मा ही लढत पाहायला मिळाली. तिसऱ्या ओव्हरमध्ये मयंक यादव गोलंदाजीसाठी आला. पहिला चेंडू मयकने वाईड टाकला. त्यानंतरच्या दोन चेंडूंवर रोहित शर्माने दोन कडक षटकार मारले. ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर रोहित कॅचआउट झाला. चेंडू वाइडच्या दिशेने जात असताना रोहितने शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पण या निर्णयामुळे चेंडू बॅटच्या कडेला लागला आणि शॉट थर्डला असलेल्या प्रिन्स यादवकडे गेला.

Rohit Sharma MI VS LSG
Corbin Bosch : इज्जतच काढली राव.. PSL सोडून मुंबई इंडियन्सकडून IPL मध्ये डेब्यू करत खेळाडूने दाखवला पाकिस्तानला ठेंगा

रोहित शर्माची विकेट पडल्यानंतर रायन रिकेल्टन आणि विल जॅक्स यांनी मोर्चा सांभाळला. रिकेल्टनने अर्धशतकीय खेळी केली. विल जॅक्सने २९ धावा केल्या. सूर्यकुमार यादवने ५४ धावा करत ऑरेंज कॅप मिळवली. तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्या आज लवकर बाद झाले. त्यानंतर शेवटच्या ओव्हर्समध्ये नमन धीर आणि कॉर्बिन बॉश यांनी डाव सावरत धावसंख्या २१५ च्या पुढे नेली.

Rohit Sharma MI VS LSG
पहलगाम हल्ल्यानंतर मोठं पाऊल! आता IPL 2025 मधील खेळाडूंना मिळणार डबल सुरक्षा, वज्र सुपर शॉट म्हणजे नेमकं आहे तरी काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com