suryakumar yadav twitter
Sports

IND vs SL,3rd T20I: आज बॉलिंग तेरा भाई करेगा! 6 धावांची गरज असताना सूर्याने असा फिरवला सामना -VIDEO

Suryakumar Yadav Last Over: भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये तिसरा टी-२० सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने शानदार विजय मिळवला आहे.

Ankush Dhavre

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा टी -२० सामना ॲक्शनपॅक सिनेमापेक्षा कमी नव्हता. आधी भारताची फलंदाजी फ्लॉप ठरली. नंतर श्रीलंकेच्या फलंदाजांनी जवळजवळ सामना जिंकून दिलाच होता. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी कमबॅक केलं. हातून निसटलेला सामना कोणी वाचवला? तर सूर्यकुमार यादव आणि रिंकू सिंग यांनी.

नेहमी फिनिशरच्या भूमिकेत असलेल्या या दोन्ही फलंदाजांनी यावेळी फलंदाजी करून नव्हे तर गोलंदाजी करून भारतीय संघाचा पराभव टाळला. हातून निसटलेला सामना बरोबरीत समाप्त झाला आणि सुपर ओव्हरमध्ये भारतीय संघाने बाजी मारत श्रीलंकेचा सुपडा साफ केला.

या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला हवी तशी कामगिरी करता आली नाही. भारतीय संघाला २० षटक अखेर ९ गडी बाद १३७ धावा करता आल्या. श्रीलंकेला हा सामना जिंकण्यासाठी १३८ धावा करायच्या होत्या. शेवटी हा सामना १२ चेंडूत ९ धावांवर येऊन पोहोचला. त्यावेळी ६ फलंदाज शिल्लक होते. त्यामुळे सामना ९० टक्के श्रीलंकेच्या बाजूने होता.

रिंकू आणि सूर्याची धारदार गोलंदाजी

शेवटचे २ षटक शिल्लक असताना मोहम्मद सिराज आणि खलील अहमदचे प्रत्येकी १-१ षटक शिल्लक होते. मात्र १९ वे षटक टाकण्यासाठी रिंकू सिंग गोलंदाजीला आला. त्याने या षटकात अवघ्या ३ धावा खर्च केल्या आणि २ फलंदाजांना माघारी धाडलं. आता वाटलं होतं की, शेवटचं षटक सिराज किंवा खलील अहमद टाकणार. मात्र सूर्यकुमार यादव स्वतः गोलंदाजीला आला आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

शेवटच्या षटकात ६ धावांची गरज असताना, १ चेंडू ३ धावांची गरज इथपर्यंत सामना पोहोचला. शेवटच्या चेंडूवर २ धावा घेतल्या गेल्या आणि हा सामना बरोबरीत संपला. सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेला २ धावा करता आल्या. सूर्याने पहिल्याच चेंडूवर चौकार मारला आणि भारतीय संघाला शानदार विजय मिळवून दिला. यासह भारतीय संघाने ही मालिका ३-० ने आपल्या नावावर केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महायुती कोल्हापूर महापालिका निवडणूक एकत्रच लढणार

Nitish Kumar : डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं पडलं महागात; मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात FIR

Couples Tips: सुखी संसाराचं सिक्रेट समजलं, नवरा बायकोने रात्री झोपण्यापूर्वी या ५ गोष्टी नक्की करा

Famous Actress Death: 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले? संपूर्ण यादी

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंना जमीन मंजूर पण आमदारकी जाणार? VIDEO

SCROLL FOR NEXT