Suryakumar Yadav Plan : मोक्याच्या क्षणी रिंकूला १९ वे षटक देऊन सूर्यकुमारनं रिस्क का घेतली? सामन्यानंतर सांगितला मास्टर प्लान!

India Vs Sri Lanka 3rd t20 : भारतीय टी २० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने अगदी शेवटच्या क्षणी रिंकू सिंहला १९ वं षटक टाकायला सांगितलं. भारताचा महत्वाचा गोलंदाज मोहम्मद सिराज याचं षटक शिल्लक असताना हा निर्णय घेण्यात आला. हेच रिंकूचं षटक सामना फिरवणारं ठरलं. सामना संपल्यानंतर सूर्यकुमार यादवनं यामागचा मास्टर प्लान सांगितला.
Team India and Suryakumar Yadav, Rinku Singh : सूर्यकुमार यादवने १९ षटक रिंकू सिंहला टाकण्यास सांगितले. रिंकूने विकेट घेतल्यानंतर दोघांनीही हटके सेलिब्रेशन केले.
Team India and Suryakumar Yadav, Rinku Singh : सूर्यकुमार यादवने १९ षटक रिंकू सिंहला टाकण्यास सांगितले. रिंकूने विकेट घेतल्यानंतर दोघांनीही हटके सेलिब्रेशन केले. PTI/AFP
Published On

भारताविरुद्ध जिंकण्यासाठी श्रीलंकेला १२ चेंडू आणि अवघ्या ९ धावांची गरज होती. तिसरा आणि अखेरचा सामना रंगतदार स्थितीत होता. त्यात भारताचा अत्यंत महत्वाचा गोलंदाज ज्यानं सुरुवातीची षटकंही जबरदस्त टाकली होती, त्या मोहम्मद सिराजचं षटकही शिल्लक होतं. तरीही १९ वं आणि सामन्याला कलाटणी देणारं हे अत्यंत महत्वाचं षटक रिंकू सिंहला टाकण्यास द्यायचा निर्णय सूर्यकुमारनं घेतला. खरं तर ही जोखीम सूर्यकुमारनं पत्करली होती. सामना हरला असता तर, सगळं खापर सूर्यकुमारवर फुटू शकलं असतं. पण इतका संघर्ष करून इथपर्यंत मजल मारणारा सूर्यकुमार यादव हार मानणारा नाही हे यापूर्वीच्या अनेक सामन्यांत दिसून आलंय. सूर्यकुमारनं रिंकूला चेंडू सोपवला आणि हा निर्णय त्यानंही सार्थ ठरवला. या षटकात रिकूनं दोन विकेट घेतल्या आणि अवघ्या तीन धावा दिल्या. सामन्यानंतर सूर्यकुमारनं यामागची त्याची रणनीती सांगितली.

श्रीलंका आणि भारत यांच्यातील तिसरा टी २० सामना काल झाला. हा सामना अत्यंत चुरशीचा झाला. सुपरओव्हरपर्यंत सामना पोहोचला आणि त्यात भारतानं बाजी मारली. एक वेळ अशी होती की, श्रीलंकेला विजयासाठी १८ चेंडूंत अवघ्या २१ धावांची गरज होती. १८ व्या षटकात खलील अहमदने १२ धावा दिल्या. सामना भारताच्या हातातून निसटलाच होता. पण सूर्यकुमार यादवने पुढचं षटक रिंकू सिंहला टाकण्यास सांगितलं. त्यावेळी १२ चेंडूंत ९ धावांची गरज होती. रिंकूने या षटकात २ विकेट घेतल्या आणि अवघ्या ३ धावा दिल्या.

अखेरच्या षटकात ६ धावा हव्या होत्या. त्यावेळी स्वतः कर्णधार सूर्यकुमार यादवने गोलंदाजी केली. त्याने अवघ्या ५ धावा दिल्या आणि दोन विकेट घेतल्या. सामना सुपरओव्हरमध्ये पोहोचला. त्यात श्रीलंकेला खास काही करता आलं नाही. सूर्यकुमार यादवनं पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकून विजयश्री खेचून आणली. सामन्यानंतर सूर्यकुमारनं १९ वे षटक रिंकूला देण्यामागचं कारण सांगितलं.

रिंकू हा उजव्या हातानं ऑफ स्पिन गोलंदाजी करतो. खेळपट्टी आणि परिस्थिती बघता त्याला चेंडू सोपवणं अधिक योग्य होतं. त्यानं गोलंदाजीचा सरावही चांगल्या प्रकारे केला होता, असं सूर्यकुमारने सांगितले.

Team India and Suryakumar Yadav, Rinku Singh : सूर्यकुमार यादवने १९ षटक रिंकू सिंहला टाकण्यास सांगितले. रिंकूने विकेट घेतल्यानंतर दोघांनीही हटके सेलिब्रेशन केले.
IND vs SL, Sri Lanka Squad: वनडे मालिकेसाठी श्रीलंका संघाची घोषणा! 2 प्रमुख खेळाडूंना केलं संघाबाहेर

२० वे षटक कोणी टाकायचे, हा निर्णय घेणे सोपे होते. पण १९ व्या षटकाबाबतचा निर्णय कठीण होता. सिराज आणि अन्य गोलंदाजांचे षटक शिल्लक होते. पण रिंकू हा विकेटसाठी योग्य गोलंदाज ठरेल असं वाटलं. नेटमध्येही त्याने चांगला सराव केला होता. त्यामुळे मी हा निर्णय घेतला, असंही सूर्यकुमारने सोनी स्पोर्ट्सवर बोलताना सांगितले.

२० वे षटक टाकण्याऐवजी तू स्वतः १९ वे षटक का नाही टाकले असा प्रश्न आशिष नेहरानं विचारला. त्यावर १९ वे षटक नेहमीच महत्वाचे आणि तितकेच अडचणीचे ठरले आहे हे मी आजवर बघितले आहे. त्यामुळे ही जबाबदारी मी रिंकूला दिली. उजव्या हातानं फलंदाजी करणाऱ्याला डाव्या हातानं गोलंदाजी करणे नेहमीच कठीण असतं. पण रिंकूनं आपलं सगळं कौशल्य पणाला लावलं आणि माझं पुढचं काम सोपं केलं. आता मला आणखी एक पर्याय सापडला आहे, असं सूर्याने सांगितले.

Team India and Suryakumar Yadav, Rinku Singh : सूर्यकुमार यादवने १९ षटक रिंकू सिंहला टाकण्यास सांगितले. रिंकूने विकेट घेतल्यानंतर दोघांनीही हटके सेलिब्रेशन केले.
IND vs SL 3rd T20: टीम इंडियाने सुपर ओव्हरमध्ये जिंकला शेवटचा T20 सामना, भारताकडून श्रीलंकेला क्लीन स्वीप

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com