Suryakumar Yadav Saam Tv
Sports

Suryakumar Yadav In IPL 2023: मुंबईचा 'सूर्या'स्त, सलग ६ सामन्यात चौथ्यांदा गोल्डन डक वर बाद; संघाबाहेर होण्याची भिती

Suryakumar Yadav Flop Performance: काही महिन्यांपूर्वी सूर्यकुमार यादवचं नाव घेतलं की गोलंदाज थर थर कापायचे

Ankush Dhavre

Suryakumar Yadav Flop Show: काही महिन्यांपूर्वी सूर्यकुमार यादवचं नाव घेतलं की गोलंदाज थर थर कापायचे. सूर्यकुमार यादव फलंदाजीला आला की चौकार आणि षटकारांचा पाऊस पडणार हे समीकरणच झालं होतं.

आक्रमक फलंदाजी करत त्याने केवळ एका वर्षात आयसीसी टी-२० रँकिंगमध्ये सर्वोच्च स्थान गाठलं होतं. मात्र आता त्याचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. कारण गेल्या काही महिन्यांपासून सतत फ्लॉप ठरतोय.

ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध निराशाजक कामगिरी केल्यानंतर आता मुंबई इंडियन्स संघासाठी खेळताना देखील त्याला हवी तशी कामगिरी करता आली नाहीये. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्व झालेल्या पहिल्या सामन्यात त्याने अवघ्या १५ धावा केल्या होत्या. (Suryakumar yadav batting record)

त्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्व झालेल्या सामन्यात तो केवळ १ धाव करून माघारी परतला होता. सूर्यकुमार यादव पुढच्या सामन्यात पुनरागमन करेल असे वाटत असताना दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याला भोपळा ही फोडता आला नाही. आता या कामगिरीनंतर त्याच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. (Latest sports updates)

सूर्यकुमार यादवने आयपीएल २०२३ स्पर्धेतील ३ सामन्यांमध्ये अवघ्या १६ धावा केल्या आहेत. याची सुरुवात ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या नागपूर कसोटीतून झाली होती. टी -२० मध्ये केलेल्या जोरदार कामगिरीच्या जोरावर त्याची भारतीय कसोटी संघात निवड करण्यात आली होती. मात्र त्याला पदार्पणाच्या सामन्यात हवी तशी कामगिरी करता आली नव्हती.

त्यानंतर श्रेयस अय्यर वनडे मालिकेतून बाहेर होताच सूर्यकुमार यादवला वनडे संघात स्थान देण्यात आले होते. मात्र या मालिकेत देखील तो सलग ३ वेळेस शून्यावर बाद होऊन माघारी परतला होता.

सूर्यकुमार यादवचा टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील रेकॉर्ड पाहिला तर त्याने ४८ टी -२० सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ४६.५३ च्या सरासरीने १६७५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ३ शतके तर १३ अर्धशतके झळकावली आहेत.

तर आयपीएल स्पर्धेतील १२६ सामन्यांमध्ये त्याने २६६० धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १६ अर्धशतके झळकावली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IB Recruitment: १०वी पास तरुणांना सरकारी नोकरीची संधी; इंटेलिजेंस ब्युरोमध्ये भरती; अर्ज कसा करावा?

Maharashtra Live News Update: कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस

Maharashtra politics : अमित शाहांचा थेट उद्धव ठाकरेंच्या खासदाराला फोन, राजकीय खेळी की फक्त शुभेच्छा?

ऑपरेशन सिंदूरवर आज चर्चा, अधिवेशन तापणार; सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होणार | Operation Sindoor

Amboli Tourism : आंबोलीजवळ असलेला छुपा धबधबा, इथं जाताच येईल फॉरेनचा फिल

SCROLL FOR NEXT