hardik pandya suryakumar yadav MI SAAM TV
Sports

Suryakumar Yadav: हार्दिक पंड्या सोडणार मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद, वर्ल्डकप विजेत्या सूर्यकुमार यादवकडं देणार धुरा? वाचा कुणामुळे सुरू झाली चर्चा

Mumbai indians captaincy controversy: मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून पुन्हा चर्चा रंगली आहे. हार्दिक पांड्याच्या जागी सूर्यकुमार यादवला कॅप्टन करावं का? माजी खेळाडूंचं मोठं विधान समोर आलंय.

Surabhi Jayashree Jagdish

टीम इंडियाचा टी20 कर्णधार सूर्यकुमार यादव फारच चर्चेत आला आहे. नुकतंच त्याच्या नेतृत्वाखाली भारताने टी-२० वर्ल्डकपवर नाव कोरलं. अशातच आता मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाबाबत सूर्याच्या नावाची चर्चा होताना दिसतेय. हार्दिकने स्वतः कॅप्टन्सी सोडून नेतृत्व सूर्याकडे सोपवावं, असं विधान भारताच्या माजी खेळाडूने केलंय.

मुंबई इंडियन्सने 2024 च्या आयपीएलपूर्वी हार्दिक पंड्याला ट्रेड करून आपल्या ताफ्यात घेतलं होतं. मुंबईच्या टीममध्ये परतताच त्याला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आणि त्याने रोहित शर्माची जागा घेतली. मात्र कर्णधार म्हणून हार्दिकला चाहत्यांकडून अपेक्षित पाठिंबा मिळाला नाही. अशातच आता टीम इंडियाचे माजी खेळाडू कृष्णमाचारि श्रीकांत यांनी मुंबईच्या कर्णधारपदाबाबत मत व्यक्त केलंय.

मुंबई इंडियन्स ही पाच वेळा आयपीएल विजेती टीम असून त्यांनी शेवटचं विजेतेपद 2020 मध्ये पटकावलं होतं. त्यानंतर मुंबई इंडियन्सला एकदाही ट्रॉफी जिंकणं शक्य झालं. त्यामुळे आगामी सिझनच्या पार्श्वभूमीवर कर्णधारपदाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. भारताचे माजी खेळाडू आणि माजी निवड समिती सदस्य कृष्णमाचारि श्रीकांत त्यांच्या मते, सूर्यकुमार यादवचं नशीब किस्मत मुंबई इंडियन्सला पुन्हा ट्रॉफी जिंकून देऊ शकते.

श्रीकांत यांनी यूट्यूब चॅनलवर बोलताना सांगितलं की, 'टीम मालक आणि मॅनेजमेंटने रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांच्यासोबत पुन्हा एकदा चर्चा करायला हवी. यंदाच्या सिझनसाठी सूर्यकुमारला कर्णधारपद देऊन पाहिलं पाहिजे. कदाचित टीमच्या नशिबात बदल होऊ शकतो. मुळात सूर्याला कधीही कॅप्टन केलं जाऊ शकतं. त्याची घोषणा करण्याची गरज नाही.'

हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदाबाबत बोलताना श्रीकांत पुढे म्हणाले, 'हार्दिक एक चांगला कर्णधार आहे. मात्र मुंबई इंडियन्सच्या टीमकडे दोन वर्ल्डकप विजेते कर्णधार आहेत. त्यामुळे हार्दिक पांड्याने मोठेपणा दाखवण्याची ही योग्य वेळ आहे. हार्दिकने स्वतः रोहित आणि सूर्याच्या नेतृ्त्वाखाली वर्ल्डकप जिंकला आहे.

श्रीकांत पुढे म्हणाले की, अशा वेळी हार्दिकने स्वतःहून पुढाकार घेत सूर्यकुमार यादवला कॅप्टन्सी सोपवली पाहिजे. तसंच मी टीमला सपोर्ट करेन, अशी भूमिका घेणं संपूर्ण टीमच्या हिताचं ठरेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

कधी आहे मुंबईचा पहिला सामना?

आयपीएल 2026 मधील मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 29 मार्च रोजी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध होणार आहे. त्यानंतर दिल्ली, राजस्थान आणि चेन्नई यांच्याविरुद्ध सामने खेळवले जाणार आहेत. 12 एप्रिलपर्यंत आयपीएलचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं असून स्पर्धेचा पहिला सामना 28 मार्चला रंगणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MI vs RCB IPL 2026:मुंबई इंडियन्सची पराभवाची हॅट्रिक, मुंबईला घरच्या मैदानात RCBनं हरवलं!

करमाळ्यात मेंढपाळसहीत महिलेला मारहाण, व्हिडिओ व्हायरल

Acid Attack: पुन्हा अ‍ॅसिड हल्ला! दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी तरुणीच्या चेहऱ्यावर फेकलं अ‍ॅसिड सदृश रसायन

Ranjangaon: भीमाशंकरनंतर आता अष्टविनायक रांजणगाव महागणपती मंदिर बंद? काय आहे कारण?

बिबट्याला पकडताना आमदार चंद्रकांत पाटलांची स्टंटबाजी|VIDEO

SCROLL FOR NEXT