पुजारा-रहाणेचं करियर संपलं? ; सुनील गावसकरांनी दिलं उत्तर
पुजारा-रहाणेचं करियर संपलं? ; सुनील गावसकरांनी दिलं उत्तर Saam TV
क्रीडा | IPL

पुजारा-रहाणेचं करियर संपलं? ; सुनील गावसकरांनी दिलं उत्तर

वृत्तसंस्था

IND vs SA: चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे हे एकेकाळी कसोटी क्रिकेटमध्ये (Test Cricket) टीम इंडियाचे (Team India) मजबूत खेळाडू मानले जात होते, पण आता तसे नाही. गेल्या दोन वर्षांपासून अत्यंत खराब फॉर्ममध्ये असलेल्या पुजारा आणि रहाणेचा फ्लॉप शो सुरूच आहे. फलंदाजीत खराब कामगिरी करूनही मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी पहिल्या कसोटीत दोन्ही फलंदाजांना संधी दिली होती. पुजारा-रहाणे दोघेही फलंदाजीत फारसे काही करू शकले नाहीत, असे असूनही जोहान्सबर्ग कसोटीत दोघांनाही संधी देण्यात आली होती पण पुजारा-रहाणे पुन्हा अपयशी ठरले.

जोहान्सबर्ग कसोटीच्या पहिल्या डावात पुजारा 3 धावा काढून बाद झाला. त्याचवेळी अजिंक्य रहाणे पहिल्याच चेंडूवर पॅव्हेलियनमध्ये परतला. हे दोघे लवकर बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा रहाणे-पुजाराला कसोटी संघात स्थान मिळेल का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. या प्रश्नाचे उत्तर जोहान्सबर्ग कसोटीत समालोचन करणाऱ्या सुनील गावस्कर यांनी बोलताना दिले. सुनील गावसकर म्हणाले की, आता फॉर्मात असलेल्या फलंदाजांना आजमावण्याची वेळ आली आहे.

समालोचन करताना सुनील गावसकर म्हणाले, 'या दोन विकेट्सनंतर असे म्हणता येईल की, कदाचित पुढील डावात पुजारा-रहाणेसाठी कसोटी कारकीर्द वाचवण्याची शेवटची संधी असणार आहे. दोघांच्या कसोटी संघातील स्थानावर आधीच प्रश्नचिन्ह होते, आता या फ्लॉप शोनंतर त्यांच्याकडे फक्त शेवटची संधी उरल्याचे दिसते असे गावसकर समालोचन करताना म्हणाले.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : कांदिवलीत निवडणूक भरारी पथकाची मोठी कारवाई; कारमधील १२ लाखांची रोकड जप्त

Pet Care in Summer: उन्हाळ्यात तुमच्या पाळीव प्राण्यांना 'या' पद्धतीनं ठेवा हायड्रेटेड

Sanju Samson Statement: इथंच राजस्थान रॉयल्सकडून चूक झाली; संजू सॅमसनने सांगितलं पराभवाचं कारण

कोल्हापूर : गाेव्याला निघालेल्या खासगी बसनं महिलेस चिरडलं, घटनास्थळी उसळली मोठी गर्दी

Vladimir Putin : पुतीन बनले पाचव्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष; शपथ घेताच पाश्चिमात्य देश आणि युद्धावर केलं मोठं भाष्य

SCROLL FOR NEXT